esakal | सलमानच्या पहिल्या किसची 'दिशा'भूल..

बोलून बातमी शोधा

salman khan
सलमानच्या पहिल्या किसची 'दिशा'भूल
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमानचा येणारा प्रत्येक मुव्ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असतो. ईद किंवा रमजान यादिवशी सलमानचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. अशावेळी अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांची डोकेदुखी वाढली आहे. बिग बजेट चित्रपटांचे प्रदर्शन रखडले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी सलमानचा बहुचर्चित राधे द मोस्ट वॉंटेट भाई हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या राधे चित्रपटाचा ट्रेलर ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याच्यावरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यात सलमान दिशाला किस करतोय असे दृश्य दाखविण्यात आले होते. सलमाननं आपण आपल्या चित्रपटामध्ये कधीही किसिंग सीन देणार आहे असे प्रॉमिस केले होते. मात्र त्यानं या चित्रपटात त्यानं ती मोडली अशी चर्चा ट्रेलरनंतर सुरु झाली. त्यावरुन सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावर सलमाननं पहिल्यांदाच खुलासा केला आहे. त्यात त्यानं जे म्हटलयं त्यावरुन पुन्हा एकदा नवीन गोष्ट समोर आली आहे.

राधेमध्ये आपण किसिंग सीन दिलायं. मात्र जिला किस केलं आहे ती दिशा नाहीये. असं सलमान खानचं म्हणणं आहे. नो किसिंग सीन ही सलमान खानची पहिल्यापासूनची पॉलिसी राहिली आहे. मात्र त्याच्या या नव्या चित्रपटामध्ये त्यानं किस केल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सला धक्का बसला आहे. त्याचे काय आहे की, राधे च्या मेकर्सनं एक बिहाइंड द सीन शुट केला आहे. सलमान आणि दिशामध्ये 27 वर्षांचे अंतर आहे. सलमाननं सांगितलयं की, या चित्रपटामध्ये किसिंग सीन आहे. मी त्यात दिशाबरोबर नाहीये. जो किसिंग सीन आहे तो टेप चिटकवून केलायं.

सलमानचा हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवानं केलं आहे. सलमान खान आणि झी स्टूडिओ यांनी मिळून हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.