esakal | Video; सिटी मारल्यानंतर सलमान म्हणतो, 'दिल दे दिया'

बोलून बातमी शोधा

bollywood actor salman khan
Video; सिटी मारल्यानंतर सलमान म्हणतो,'दिल दे दिया'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ चित्रपटातील सिटी मार गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानं दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित होणार असल्याची माहिती सोशल मीडियातून शेअर केली होती. त्याच्या पहिल्या गाण्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सध्या दिल दे दिया गाणे सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सलमान खानच्या आगामी 'राधे'मधून बहुप्रतीक्षित डांस नंबर 'दिल दे दिया' आज प्रदर्शित झाले आहे. या पावर-पॅक डान्स ट्रॅकमध्ये सलमान खान आणि जैकलीन फर्नांडीज दिसणार आहेत. गाण्याचे टीज़र काल प्रदर्शित करण्यात आले होते,

दिल दे दिया है, हे गाणे पेप्पी नंबर ग्रूवी डान्स मूव्स आणि इलेक्ट्रिफाइंग बीट्सचं कॉम्बिनेशन आहे. जॅकलीन यात एथनिक ड्रेसमध्ये दिसत असून तिने तो अतिशय सुंदरपणे कॅरी केलायं. सलमान काळ्या रंगाच्या कॅज्युअल सूटमध्ये नेहमीप्रमाणे हँडसम दिसत आहे. जॅकलीन आणि सलमान मधली सिजलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावण्यासाठी तयार झालीये. हे गाणं आणि त्याच्या चित्रिकरणाच्या अनुभवाहबद्दल सांगताना जॅकलीन म्हणाले, “जेव्हा पण सलमान आणि मी एकत्र काम करत असतो, ते सर्वोत्तम असते. त्याची एनर्जी दमदार असते. ‘राधे’मधले ‘दिल दे दिया’ माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे माझ्या आधीच्या डांस नंबरहून पूर्णपणे वेगळे आहे. यासोबतच, डांसिंग लेजेंड प्रभुदेवा सरांद्वारे लेन्समागून आम्हाला दिग्दर्शित करताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव होता.

आम्ही या गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप एन्जॉय केले. मी केवळ हे करू इच्छित होते आणि मी हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी फार उत्सुक आहे”, जैकलीनने गाण्याच्या चित्रिकरणाविषयीच्या आपल्या अनुभवांविषयी सांगितले. ‘राधे’चा दिग्दर्शक प्रभुदेवानं सांगितले की, "स्क्रीनवर जॅकलीनचे ग्लॅमर आणि व्यक्तिमत्व सर्वात वेगळे आहे आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. या गाण्यासाठी ती आमची एकमेव पसंती होती. मला माहिती होते कि ती अभूतपूर्व काम करेल आणि आम्ही निश्चितपणे मिळालेल्या आउटपुटने रोमांचित झालो आहोत. तिने कोरियोग्राफीला पूर्ण न्याय दिला आहे आणि मला आशा आहे की हे सगळ्यांना आवडेल."

हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे. सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.