esakal | सलमानचं Seeti Maar भारी की अल्लु अर्जुनचं...

बोलून बातमी शोधा

bollywood actor salman khan seeti maar song

सलमानचं Seeti Maar भारी की अल्लु अर्जुनचं...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडच्या भाईजानच्या राधे द मोस्ट वाँटेड या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला होता. मात्र काहींनी सलमानला त्यावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या इतर चित्रपटांसारखाच हा चित्रपट आहे असे त्यांचे म्हणणे होते. जसे की काही वर्षांपूर्वी त्याचा वाँटेड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र तो एका साऊथच्या मुव्हीवर बेतलेला चित्रपट होता असे म्हटले जाते. सध्या त्याच्या नव्या राधे चित्रपटावरुन उलट सुलट प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या जात आहेत. त्याच्या या नव्या चित्रपटातील गाणे नुकतेच व्हायरल झाले आहे. त्याला हजारो व्ह्युज तर मिळाले. तसेच त्याच्यावर टीकाही झाली आहे.

दाक्षिणात्य हिरो अल्लु अर्जुननं खास व्टिट करुन सलमानच्या नव्या गाण्याचं कौतूक केलं आहे. त्यानं भाईजानला शुभेच्छाही दिल्या आहेत. सुरुवातीला सलमाननं अल्लु अर्जुनच्या गाण्याचं आणि त्याच्या डान्सचं कौतूक केलं आहे. अल्लुच्या डान्सवर चाहते फिदा झाले होते. जबरदस्त डान्स अल्लुनं केला होता. त्यामुळे जेव्हा सलमानचे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी अल्लु आणि सलमानची तुलना केली. डान्स, गाणेच्या तुलनेत अल्लु वरचढ असल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांनी अल्लुच्या डान्सचं कौतूक केलं आहे.

ईंदच्या वेळी सलमानचा हा नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना सलमानच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. सलमाननं अल्लु अर्जुनचे कौतूक केलं आहे. आज सलमानच्या राधे चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील सिटी मार हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी प्रेक्षकांनी अल्लु अर्जुनच्या पूर्वीच्या चित्रपटातील तेच गाणे व्हायरल करुन सलमानच्या आणि त्याच्या गाण्याची, डान्सची तुलना केली आहे.

सलमानसोबत दिशा पटानीही या चित्रपटात आहे. 2017 मध्ये अल्लु अर्जुनच्या एका तेलुगु चित्रपटातील हे गाणे आहे. सलमाननं सिटी मार साठी अर्जुनला धन्यवाद दिले आहे. त्यानं लिहिलं आहे की, धन्यवाद अर्जुन, तु त्या गाण्यामध्ये कमाल केली आहेस, तुझा डान्स सुंदर आहे. त्याच्या कौतूकाला अर्जुननंही धन्यवाद दिले आहेत.