बॉलिवूड अभिनेता संजय दत्त रुग्णालयातून घरी परतला; चाहत्यांना दिली स्वतःहून 'ही' माहिती

संतोष भिंगार्डे
Monday, 10 August 2020

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेले दोन दिवस लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या संजय दत्तला आजा डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेले दोन दिवस लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या संजय दत्तला आजा डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

रिव्ह्यु: पुरुषीपणाला सणसणीत उत्तर गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल - 

संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती आणि तो लवकरच घरी परतेल असे सांगण्यात आले. खुद्द संजय दत्तने शनिवारी सोशल मीडियावर माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही चाचण्या बाकी आहेत आणि आपण लवकरच घरी परतणार आहोत असे सांगितले होते. आज त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.
 ---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actor Sanjay Dutt returns home from hospital; This information was given to the fans by himself