'तु जितना मांग रहा है, उतनी तेरी कमाई नही', Jersey Trailer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'तु जितना मांग रहा है, उतनी तेरी कमाई नही',  Jersey Trailer
'तु जितना मांग रहा है, उतनी तेरी कमाई नही', Jersey Trailer

'तु जितना मांग रहा है, उतनी तेरी कमाई नही', Jersey Trailer

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडमध्ये प्रयोगशील अभिनेता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या शाहिद कपूरचा जर्सीचा ट्रेलर आज व्हायरल झाला आहे. वास्तविक या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत होते. आता त्याचा ट्रेलर रिलिज झाल्यानं प्रेक्षकांना दिलासा आहे. काही तासांपूर्वी रिलिज झालेल्या या ट्रेलरला आतापर्यत 11 लाख व्ह्युज मिळाले आहेत. या चित्रपटामध्ये शाहिदच्या सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, पंकज कपूर दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या होत्या. स्पोर्टस ड्रामा असणाऱ्या या चित्रपटामध्ये एका खेळाडूचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. मृणालनं या चित्रपटामध्ये त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. जेव्हा ऐन भरात असलेला क्रिकेटर क्रिकेट सोडून देतो. त्यानंतर त्याला सामोऱ्या जाव्या लागलेल्या संघर्षाविषयी हा चित्रपट आहे. त्याची आता कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आपल्या लहान मुलाला त्याच्या बर्थ डे च्या दिवशी जर्सी आपण देऊ शकत नाही. याचे त्याला कमालीचे वाईट वाटते. त्यातून तो पुन्हा मैदानात उतरतो. ज्या वयात खेळाडू रिटायरमेंट घेतात त्या वयात तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी येतो. अशी ही सर्वसाधारण या चित्रपटाची कथा आहे. वास्तविक हा चित्रपट तेलुगू सुपरहिट चित्रपट जर्सीचा रिमेक आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गौतम यांनी केले होते.

यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर शेयर करताना शाहिदनं लिहिलं होतं की, आता योग्य वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही वाट पाहत होतो. अखेर तो आता तुमच्यासमोर येणार आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. त्याचा विषय स्पेशल आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या चित्रपटाची टीमही खास आहे. मला आशा आहे की, तुम्हा सगळ्यांना हा चित्रपट कमालीचा आवडेल. असेही शाहिदनं म्हटलं आहे. 31 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

loading image
go to top