esakal | एक बार 'सनक' गयी ना तो फिर देख : ट्रेलर पाहाच!
sakal

बोलून बातमी शोधा

एक बार 'सनक' गयी ना तो फिर देख : ट्रेलर पाहाच!

एक बार 'सनक' गयी ना तो फिर देख : ट्रेलर पाहाच!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडचा अॅक्शन (bollywood action hero) हिरो विद्युत जामवालच्या (vidyut jamwl) सणकचा (sanak) ट्रेलर सध्या व्हायरल झाला आहे. विद्युतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या ट्रेलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टंटमॅन म्हणून विद्युतनं बॉलीवूडमध्ये ओळख तयार केली आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर त्याचा फॅन फॉलोअर्सही लाखो आहे. अशावेळी सनकला मिळालेला प्रतिसादही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याच्या ट्रेलरमधून दिसुन येत आहे की, हा चित्रपट किती रंगतदार असणार आहे ते, विद्युतचे चित्रपट हे नेहमीच चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्याचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आता जो ट्रेलर व्हायरल झाला आहे त्यात एका हॉस्पिटलमधील चित्तथरारक दृश्ये दाखवण्यात आली आहे. रोमान्स आणि अॅक्शन य़ा प्रकारातील या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. यापूर्वी विद्युतनं 'सनक' या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाआधी हाई-ऑक्टेन ऍक्शनने सगळ्यांना थक्क केलं होतं. बहुप्रतीक्षित एंटरटेनर 'सनक - होप अंडर सीज'च्या अधिकृत ट्रेलरचे काउन्ट डाउनचा तो कार्यकम होता. हा चित्रपट डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. विद्युतने एका जळत्या एलईडी स्क्रीनला तोडत कार्यक्रमात बहारदार एंट्री घेतली आणि दर्शकांना चकित केलं होतं. कनिष्क वर्मा यांच्याद्वारे दिग्दर्शित 'सनक'मध्ये प्रेक्षकांसमोर एक अशी शैली सादर करण्यात आली आहे, जिला अजूनपर्यंत जास्त एक्सप्लोर करण्यात आलेले नाहीये. या चित्रपटात विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा दिसणार आहे,

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल विद्युत जामवालनं सांगितलं होतं की, “सनकसोबत आम्ही दर्शकांसाठी एड्रेनालाईन अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व एक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. निर्माते विपुल शाह म्हणतात की, "सनक - होप अंडर सीज' एक एक्शनने भरपूर असा थ्रिलरपट असून, याचे कथानक एक व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काय करू शकतो याच्या आसपास फिरते आणि हाच या कथेचा मुख्य गाभा आहे.

हेही वाचा: विद्युत जामवालचा 'सनक' दसऱ्याच्या मुहूर्तावर...

हेही वाचा: विद्युत जामवालचा 'सनक' डॅशिंग लूक व्हायरल!

loading image
go to top