esakal | Action Hero: विद्युत जामवालचा 'सनक' दसऱ्याच्या मुहूर्तावर...
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत जामवालचा 'सनक' दसऱ्याच्या मुहूर्तावर...

विद्युत जामवालचा 'सनक' दसऱ्याच्या मुहूर्तावर...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

ऑक्टोबमध्ये थिएटर सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जे प्रोजेक्ट रखडले होते. ते यानिमित्तानं मार्गी लागणार आहे. चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट कधी थिएटरमध्ये जावून पाहतो या प्रतिक्षेत होते. आता त्यांना थिएटरमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. बॉलीवूडच्या निर्मात्यांनी पुढील वर्षीचे आपले वेळापत्रक आता जाहीर केले आहे. मोठ्या बॅनर आणि स्टारकास्ट असलेले चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची लिस्टही समोर आली आहे. त्यात बॉलीवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवालच्या सनकचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात डिजनी+हॉटस्टारवर 'सनक- होप अंडर सीज'च्या प्रदर्शनाची घोषणा झाली होती. आता निर्माते - विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोज या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. ज्यामध्ये विद्युत जामवाल, बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा, नेहा धूपिया आणि चंदन रॉय सन्याल मुख्य भूमिकेत असणार आहेत. कनिष्क वर्मा दिग्दर्शित 'सनक' येत्या दसऱ्याला, म्हणजेच 15 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. घोषणेसोबतच, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. विपुल शाह म्हणाले की, "कोविड -19 च्या सर्वात कठीण परिस्थितीत आम्ही शूट केलेल्या 'सनक'ची तारीख जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.

या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी सुंदर अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या वेळी झी स्टूडियोजच्या सहयोगाने, त्यांचे प्रोडक्शन 'सनक - होप अंडर सीज' या धमाकेदार एक्शनपटासोबत सज्ज झाले आहेत. विद्युत चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून आपल्या करिअरमध्ये यशस्वी निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5वा चित्रपट आहे.

हेही वाचा: विद्युत जामवालचा 'सनक' डॅशिंग लूक व्हायरल!

हेही वाचा: विद्युत जामवालनं गुपचूप उरकला साखरपूडा, फोटो व्हायरल

loading image
go to top