Vikram Gokhale Death: विक्रम गोखलेंचे निधन, बॉलिवूडमध्ये शोककळा, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Vikram Gokhale Death
Vikram Gokhale DeathEsakal

आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या  निधनानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीतुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अक्षय कुमार ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली

विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर खूप दुःख झाले. 'भूल भुलैया', 'मिशन मंगल' यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. ओम शांती

Vikram Gokhale Death
Vikram Gokhale Death: हिंदीत सुद्धा यश मिळवणारे मोजके मराठी अभिनेते होते त्यात प्रमुख नाव यायचं विक्रम गोखले

अनुपम खेर: दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अनुपम खेर यांना दु:ख झाले आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले. विक्रम गोखले!

Vikram Gokhale Death
Vikram Gokhale Death :'या' चित्रपटाच्या माध्यमातून विक्रम गोखले कायम स्मरणात राहतील..

मनोज बाजपेयी : भारतीय चित्रपटाने रत्न गमावलं. अय्यारीमध्ये त्याच्यासोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आणि सेटवर त्याच्यासोबत खुप काही शिकायला मिळालं. श्री विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे.

अशोक पंडित : मराठी रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीचे आदरणीय विक्रम गोखलेजी आता आपल्यात नाहीत. हे चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना मी आमच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो!

राहुल देव: विक्रम गोखलेजी राहिले नाहीत हे ऐकून वाईट वाटले. ते एक सच्चा सज्जन आणि पूर्ण अभिनेता होते. त्याच्या कलाकृतीने त्याच्या सर्व भूमिकांना प्रतिष्ठा दिली. मी त्याच्यासोबत काम केले ही होते. त्यांच्या कुटुंबियांना मी आमच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो

राजीव पॉल : विक्रम गोखलेजी प्रेमळ, दयाळू माणूस होते. त्यांच्या निधनाबद्दल कळाल्यावर दुःख झाले. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 'परिवार' आणि नंतर 'नर्गिस'मध्ये त्यांच्यासोबत काम केले. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले .ओम शांती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com