esakal | सरोज खान यांना बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

सरोज खान यांना बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली

सरोज खान यांना बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली

सरोज खान यांना बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मी आज कोसळले आहे. निःशब्द झाले आहे . माझ्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात सरोज यांचे मोठे योगदान आहे .
त्यांनी मला केवळ नृत्यच नाही तर आयुष्यातील अनेक गोष्टी शिकविल्या. त्यांच्या सर्व आठवणींना आज उजाळा मिळत आहे. मला त्या आठवणी स्वस्थ बसू देणार नाहीत.

माधुरी दीक्षित -
----------------------------------------------

 तिच्यासाठी दोन्ही हात जोडलेत. मात्र मनात प्रचंड काहूर आहे. मन अशांत आहे.

- अमिताभ बच्चन 

-------------------------------------------------

आम्हा नृत्य दिगर्शकांची आजी आम्हाला सोडून गेली. आम्ही पोरके झालो. त्या माझ्यासाठी खूप विशेष
होत्या . रेमो यांनी इन्स्टावर सरोज यांच्या सोबतचा फोटोही शेअर केला आहे.

रेमो डिसुझा -

---------------------------------------------------

मी आभारी आहे की मला सरोज यांचा सहवास लाभला होता. त्यांच्याकडून आयुष्यभराची शिकवण  नृत्यरूपाने घेतली . ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती लाभू दे. कुटुंबियांना दुःख पचविण्याची शक्ती दे .

अभिनेत्री जेनेलिया देशमुख

----------------------------------------------------

सरोजच्या निधनाने मला धक्का बसला. नृत्यातील सम्राज्ञी सरोज यांच्या सोबत बिल्लो राणी... गाण्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री

-----------------------------------------------------

सरोज यांच्या बातमीने अस्वस्थ झालो. निधनाने नृत्यातील एका पर्वाचा अंत
झालाय.

सुनील ग्रोवर 

---------------------------------------------------

माझ्या आयुष्यात नृत्य हा शब्द सरोज यांनीच आणला. त्यांच्या नृत्याच्या शैली फिल्म इंडस्ट्रीत अजरामर राहतील. एका पर्वाचा अंत .
त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यास बळ मिळो .

निमरत कौर

--------------------------------------------

नृत्याची महाराणी #सरोजखान जी गुडबाय. तुम्ही फक्त कलाकारांनाच नव्हे तर संपूर्ण भारताला खूप सुंदरपणे शिकवले की "माणूस शरीराने नाही तर हृदय व आत्म्याने नाचतो". तुम्ही जाताच नृत्याची लय डगमगेल.  मी तुम्हाला केवळ व्यक्तीम्हणूनच नाही तर तुमच्या गोड रागवण्यालाही आठवण करेन. 

अनुपम खेर

-------------------------------------------------


”महान नृत्यदिग्दर्शक # सरोजखान जी आता राहिले नाहीत याची खिन्न बातमीने मी जागा झालो. त्यांनी नृत्याला इतकं सोपं बनवलं जसं की प्रत्येकजण नाचू शकतो. हे या क्षेत्राचं एक मोठं नुकसान आहे. त्यांच्या आत्मास शांतीत शांतता लाभो "

अक्षय कुमार

--------------------------------------------------