फॅशनच्या नावाखाली काही कपडे घालायचे का?; आलियावर फॅन्स भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'फॅशनच्या नावाखाली काही कपडे घालायचे का?'; आलियावर फॅन्स भडकले
फॅशनच्या नावाखाली काही कपडे घालायचे का?; आलियावर फॅन्स भडकले

'फॅशनच्या नावाखाली काही कपडे घालायचे का?'; आलियावर फॅन्स भडकले

मुंबई - बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक फेस्टिव्ह सीझन सुरु झाला आहे. वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या लग्नाची तयारी सध्या वेगानं सुरु आहे. नुकतचं प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा शुभविवाह पार पडला. त्यानंतर विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची चर्चा आहे. दुसरीकडे आलिया आणि रणवीर कपूरच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी आपल्या लग्नाची तारीख देखील जाहीर केल्याचे कळते आहे. अशावेळी ते दोघेजण लग्नाच्या तयारीत आहे. दरम्यान आलियानं सोशल मीडियावरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं जे कपडे घातले आहे. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे कपडे घालण्यात नेमका काय उद्देश आहे असा प्रश्न तिला चाहत्यांनी विचारला आहे.

बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटी प्रसिद्धीसाठी नाना तऱ्हेच्या कल्पना लढवत असतात. कधी हटके फॅशन करुन, तर कधी वेगळ्या लूकनं चाहत्यांना इंप्रेस करुन हे नाही जमलं तर एखादं वादग्रस्त विधान करुन ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या रणवीरच्या होणाऱ्या पत्नीची म्हणजे आलियाच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तिनं अजब फॅशन करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या फोटोला जशा वेगवेगळ्या प्रकारे कौतूक करणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. याप्रकारे पोशाख करून नेहमीपेक्षा वेगळंपण आलियानं सिद्ध केलं आहे. असेही चाहत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या आलियाच्या त्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

आदित्य सील आणि अनुष्का रंजन हे आज विवाहबद्ध होणार आहेत. त्यानिमित्तानं काल एका संगीत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या पार्टीला आलियाही उपस्थित होती. तिच्या ड्रेसनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्या पार्टीमध्ये आलियासहीत क्रिस्टल डिसूजा, वाणी कपूर, रवीना टंडन, भूमी पेडणेकर उपस्थित होत्या. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यासगळ्यात आलियानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आलियानं जो ड्रेस परिधान केला होता त्यावरुन तिचं कौतूक तर झालंच पण तिला ट्रोलही करण्यात आले. तिच्या काही चाहत्यांना तिचा तो लहंगा चोलीचा अंदाज आवडला नाही. त्यामुळे त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, पारंपारिक वेशभूषा आहे. त्याला मी श्रद्धांजली वाहतो. दुसऱ्यानं तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदशी केली आहे. आणखी एकानं अशाप्रकारचे कपडे का परिधान करता असा सवाल आलियाला केला आहे.

loading image
go to top