ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो व्हायरल! बच्चन कुटूंबियांनी लावला डोक्याला हात! |Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan Document | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Aishwarya Rai

ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो व्हायरल! बच्चन कुटूंबियांनी लावला डोक्याला हात!

Bollywood Actress - विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय - बच्चनची डोकेदुखी वाढवणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर देखील ती बातमी व्हायरल झाली आहे. त्याचे झाले असे की, ऐश्वर्या रॉयच्या पासपोर्टचा फोटो व्हायरल झाला आहे. (Aishwarya Rai - Bachchan) त्यामध्ये ऐश्वर्याचा फोटो पाहून नेटकरी जाम खुश झाले आहे. विना मेक अप ऐश्वर्याचा फोटो त्यांना त्या पासपोर्टवर पाहता आला आहे. दुसरं म्हणजे पासपोर्टसारख एवढं महत्वाचं डॉक्युमेंट सोशल मीडियावर अशा (Social media viral news) प्रकारे व्हायरल होणे हे काही बच्चन कुटूंबियांसाठी धक्कादायक होतं. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील काही सेलिब्रेटींच्या पर्सनल डॉक्युमेंटचे फोटो व्हाय़रल झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या, तिचा पती अभिषेक बच्चन आणि मुलगी (Bollywood Actors) आराध्या हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्याचे कारण त्यांची कान्समधील इंट्री. त्यामध्ये ऐश्वर्यानं केलेला मेक अप, त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागल्याचे (entertainment news) दिसून आले आहे. त्यानंतर अभिषेकला देखील नेटकऱ्यांनी त्या फेस्टिव्हलमधील फोटोंमुळे धारेवर धरले होते. आराध्याचा डान्स हा देखील नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय होता. आता ऐश्वर्या ही तिच्या पासपोर्टच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. बच्चन कुटूंबातील सुनेच्या पासपोर्टचा फोटो असा सोशल मीडियावर व्हायरल झालाच कसा? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जगातील ज्या सर्वाधिक सुंदर अभिनेत्री आहेत त्यात भारतातील एका अभिनेत्रीच्या नावाचा हमखास समावेश असतो. ती म्हणजे ऐश्वर्या रॉय, ऐश्वर्या ही केवळ तिच्या सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाहीतर तिच्या अभिनयाचे चाहते जगभर पसरले आहेत. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तिनं निर्माण केली आहे. दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या ऐश्वर्याची लोकप्रियता आजही कायम आहे. जगभरातील सर्वोत्तम चित्रपट, उत्पादनांची जाहिरात करणारी जी मासिकं आहेत त्यावर ऐश्वर्याचा फोटो झळकलेला आहे. टाइम्स या जगप्रसिद्ध मासिकानं देखील तिच्या अभिनयाची दखल घेतली आहे.

Aishwarya passport photo

Aishwarya passport photo

हेही वाचा: Aishwarya Rai Good News: मणिरत्नम यांच्या 'PS1' मधून कमबॅक

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या पासपोर्टचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यातील एक गोष्ट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. ती गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा पासपोर्ट साईज फोटो. तिच्या यापूर्वीच्या मेकअपमधील फोटोंना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र पासपोर्टवरील फोटोनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो फोटो आता टॉक ऑफ द टाऊन झाला आहे. नेटकऱ्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही ऐश्वर्याचा पाहिलेला हा सर्वोत्तम फोटो आहे.

हेही वाचा: Vikram: विक्रमच्या सक्सेस पार्टीत सलमानची हजेरी ! सोशल मीडियावर फोटो वायरल

Web Title: Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan Document Viral On Social Media Fans Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top