RRR - आलियाच्या बर्थडेला चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट

RRR Movie first look
RRR Movie first look
Updated on

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या नव्या चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. आलियाच्या गंगूबाई काठयावाडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला आलियाच्या चाहत्यांची पसंती मिळाली पण काही नेटकऱ्यांना मात्र हा ट्रेलर फारसा आवडला नाही. गंगूबाईच्या लूकमध्ये आलिया सूट होत नाही असे काहींचे मत होते. अनेकांनी तिला तिच्या अभिनयासाठी ट्रोल  केले. याआधी आलियाच्या  सडक-2 चित्रपटावरही प्रेक्षकांनी टीका केली होती. 

2021 मध्ये आलियाचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापैकी एक चित्रपटमधील म्हणजे 'आर आर आर'. नुकतीच आलियाने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'आर आर आर' या चित्रपटामधील तिच्या पहिल्या लूकची तारीख जाहीर केली आहे. 'आलिया भट एज सिता पहिला लूक 15 मार्चला 11 वाजता आर आर आर' असे या पोस्टरमध्ये लिहीले आहे. या चित्रपटातील सिता नावाच्या प्रमुख भूमिकेत आलिया दिसणार आहे. 

आलियाच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 15 मार्चला तिचा या चित्रपटातील पहिला लूक रिलीज होणार आहे. आर आर आर तेलगू चित्रपट आहे. तेलगू सोबतच हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे  दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी केले आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात आलिया सोबत राम चरण, ज्युनियर  एन टी रामा राव आणि अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  

'आर आर आर' चित्रपटाबरोबरच आलियाचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट देखील या वर्षी प्रदर्शित होणार आहे. आलियाच्या 'आर आर आर' मधील सितेचा फस्ट लूक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक वेळा आलियाने हा चित्रपट सोडला अशी अफवा पसरली होती पण आलियाच्या पोस्टमुळे आता आलियाच या चित्रपटात सितेची भूमिका करणार आहे यावर शिक्का मोर्तब झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com