
Amrita Arora Birthday: करिना, करिश्मा, मलायकाचं 'ग्रँड सेलिब्रेशन!'
Amrita Arora Birthday: बॉलीवूड सेलिब्रेटींचं (Bollywood actress) बर्थ डे सेलिब्रेशन (birthday celebration) हा नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. आज बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोराची (Malaika Arora) बहिण अभिनेत्री अमृता अरोराचा जन्मदिन आहे. तिनं त्यानिमित्तानं काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यामध्ये करिना, करिश्मा, मलायका यांनी तिचा जन्मदिन साजरा केला आहे. नेटकऱ्यांनी देखील तिला मोठ्या उत्साहानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवू़डमध्ये निवडक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अमृताचा बॉलीवूडमधील प्रवास फार काळ नव्हता. ती सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये स्टार सेलिब्रेटी म्हणून हजेरी लावत असल्याचे दिसून आले आहे.

बॉलीवूडची बेबो करिना कपूरनं देखील अमृताचे फोटो सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. तिनं त्या फोटोंना कॅप्शन देताना लिहिलं आहे की, माझी अमु...तिला जन्मदिनाच्या शुभेच्छा. चाहत्यांना देखील या मैत्रींणीचं कौतूक वाटलं आहे. त्यांनी यासगळया जणींना शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाच्या इंस्टाच्या स्टोरीला अमृतानं शेयर केले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं सोशल मीडियावर गेट टू गेदर चे काही फोटो शेयर केले होते. त्यात मलायका, अमृता अरोरा, करण जोहर सहभागी झाले होते. मनीषनं ते फोटो सोशल मीडीयावर शेयरही केले होते.
हेही वाचा: Video: 'पुष्पा नाम सुनकर flower समझे क्या, फायर है मैं फायर'
Web Title: Bollywood Actress Amrita Arora Birthday Celebration Kareena Malaika Karishma Celebration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..