esakal | कोरोना आहे म्हणून ' नो बर्थ डे सेलिब्रेशन'

बोलून बातमी शोधा

bollywood actress anushka sharma  and virat kohali
कोरोना आहे म्हणून 'नो बर्थ डे सेलिब्रेशन'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना वाढता धोका पाहून सर्वांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला सर्व शासकीय यंत्रणाही युध्दपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. राज्यातील 14 ते 44 वयोगटातील व्यक्तींना मोफत व्हॅक्सिन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी होईल, असा विश्वास सरकारला आहे. कोरोनाचे युध्द जिंकण्यासाठी आता वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटीही सहभागी झाले आहेत. बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मानंही आपण कोरोनामुळे जन्मदिन साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर यासंबंधीची पोस्टही शेअर केली आहे.

1 मे ला अनुष्काचा 33 वा जन्मदिवस होता. मात्र यावेळी तिनं वाढदिवस साध्या पध्दतीनं साजरा केला आहे. तिला बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी तिला अभिनंदनपर मेसेज पाठवले आहेत. अनुष्कानं एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. तसेच आपण विराट सोबत एक नवीन प्रोजेक्ट सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. ते कोरोना रुग्णांसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. तिनं त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे. अनुष्कानं इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला होता.

अनुष्का म्हणते, मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण सुरक्षित असाल. तुम्ही मला वाढदिवसाच्या दिवशी ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवादही देते. तुम्ही माझा जन्मदिवस खुप आनंददायी केला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीविषयी तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे मला जन्मदिवस साध्या पध्दतीनं साजरा करावासा वाटला. त्यामागील हे कारण आहे. मोठ्या पध्दतीनं वाढदिवस साजरा करावा योग्य वाटले नाही.

त्या व्हिडिओमध्ये अनुष्कानं सांगितलं की, मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. देश संकटात आहे. अशावेळी देशाला मदत करावी लागेल. त्यामुळे मी आणि विराटनं एकत्रितपणे प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तो काय असणार आहे याचे डिटेल्स थोड्याच दिवसांत शेअर करणार आहे.