esakal | 'जवळचे दोनजण 24 तासांत गेलेत, तीन जण गंभीर'
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actress bhumi pednekar

'जवळचे दोनजण 24 तासांत गेलेत, तीन जण गंभीर'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर सतत वाढताना दिसत आहे. त्याला आवाक्यात आणण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजून कोरोनाला हरवण्यात अपयश आले आहे. व्हॅक्सिनेशनच्या बाबत शासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. बॉलीवू़डमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढतो आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीला सामोरं जाताना बॉलीवूड सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर काही जणांनी कोरोना गंभीर रुप धारण करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकरनं तिला कोरोनाविषयक आलेल्या अनुभवांविषयी भाष्य केले आहे. तिनं जी पोस्ट केली आहे त्यात ती भावूक झाली आहे. गेल्या २४ तासांत आपण आपल्या जवळच्या दोन व्यक्तींना गमावले असून तीन जण अत्यस्थ असल्याचं तिनं सांगितलं आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी भयानक ठरताना दिसत आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. भूमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. ती वेगवेगळ्या प्रकारची माहीती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यानिमित्तानं चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

भूमीनं आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, मागील 24 तासांत मी माझ्या दोन लोकांना गमावले आहे. ज्यांच्यावर मी फार प्रेम करते. अजून तीन लोकांची स्थिती गंभीर आहे. मी माझा अख्खा दिवस त्या लोकांना ऑक्सिजन आणि बेड्स मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. मात्र माझी लढत अपूरी ठरली. आता शोक करण्यात काही अर्थ नाही. मात्र ही परिस्थिती लवकरात लवकर निवळावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे योगदान अपेक्षित आहे.

loading image