esakal | लग्नानंतर दिया करतीये खास पाहूण्याचे लाड; पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

diya mirza

दियाच्या लग्न सोहळ्यात कन्यादान आणि वधूची पाठवणी हे लग्न विधी झाले नाहीत. तसेच या लग्नातील सजावट देखील पर्यावरणपूरक (इको फ्रेंण्डली) होती.

लग्नानंतर दिया करतीये खास पाहूण्याचे लाड; पाहा VIDEO

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री दिया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखी सोबत लग्नाच्या बंधनात अडकली. वैभव बिझनेसमन आहे. दिया आणि वैभवच्या लग्नात महिला पुजारी होती. यामुळे विवाह सोहळा चर्चेत होता. दियाच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. दियाच्या लग्न सोहळ्यात कन्यादान आणि वधूची पाठवणी हे लग्न विधी झाले नाहीत. तसेच या लग्नातील सजावट देखील पर्यावरणपूरक (इको फ्रेंण्डली) होती. आपण ज्याला घर म्हणतो ते खरंतर प्रेमाचं एक पूर्ण वर्तुळ आहे. तो क्षण किती अद्भुत असतो जेव्हा तुम्ही दारावरची टकटक ऐकता, दरवाजा उघडता आणि तुम्हाला ते प्रेम मिळतं. माझ्या आय़ुष्यातील हा आनंदाचा क्षण शेअर करत आहे. आयुष्यात ज्या काही गोष्टी मिसिंग होत्या त्या मिळाल्या अशा शब्दात दियाने भावना व्यक्त केल्या होत्या.

नुकताच दियाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिया एका कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेऊन बसलेली आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. लग्नानंतर लगेचच दिया कामामध्ये व्यग्र झाली. शूटिंगच्या सेटवर दियाला एका कुत्र्याचे पिल्लू घेऊन बसलेली आहे. या पिल्लाचे लाड करतानाचा व्हिडीओ दियाने सोशल मिडीयावर शेअर केला. व्हिडीओला दियाने कॅप्शन दिले की,' रविवारचा आनंद, एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लासोबत'. हा व्हिडीओ 70 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला. दियाच्या एका चाहत्याने या व्हिडीओला कमेंट केली ,' आतापर्यंतचा सर्वात क्युट व्हिडीओ'. आणखी एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले,'मला समजत नाही की व्हिडीओमध्ये सर्वात क्युट कोण आहे.'

पाहा VIDEO  - थलाइवी'च्या ट्रेलर रिलीजला कंगना का झाली भावूक

दियाच्या या व्हिडीओमध्ये दिया आणि या कुत्र्याच्या पिल्लामधले प्रेमळ नाते तिच्या चाहत्यांना पहायला मिळाले. ति सोशल मिडीयावर खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो दिया सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी दियाने बागेत झाडांना पाणी देतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्या व्हिडीओला देखील दियाच्या चाहत्यांनी पसंती दिली.

loading image