esakal | तूफान!! इतक्या गर्मीतही गुल पनाग ५ किलोमीटर धावली
sakal

बोलून बातमी शोधा

तूफान!! इतक्या गर्मीतही गुल पनाग ५ किलोमीटर धावली

तूफान!! इतक्या गर्मीतही गुल पनाग ५ किलोमीटर धावली

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनयात तर अभिनेत्री गुल पनाग (gul panag) भारी आहेच पण त्याशिवाय ती आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते. तिच्या फिटनेसची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होत असते. ती नेहमी त्याबदद्लचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियापर शेयर करते. सध्या तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात तिनं आपण केलेल्या आगळ्या वेगळ्या गोष्टीविषयी सांगितली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुल पनाग सोषल मीडियावर जास्तच अॅक्टिव्ह झाली आहे. तिचा रनिंग मोडमधील तो फोटो कौतूकाचा विषय आहे. (bollywood actress gul panag did 5km running in hot humid day says it is like a therapy yst88)

गुलनं जो फोटो शेयर केला आहे त्यात ती स्पोर्टिव्ह लूकमध्ये (sportive) आहे. तिनं डोळ्यांना गॉगल (goggle) लावला आहे. एका फिटनेस ट्रेनरच्या भूमिकेत ती दिसते आहे. तिनं त्या फोटोविषयी सांगताना लिहिलं आहे की, आज आपण 5 किमी धावलो आहोत. भवतालचे वातावरण गर्मीचे होते. प्रचंड उकडत होते. अशावेळी धावणे सोपं नव्हतं. मात्र तरीही हा प्रयोग करुन पाहिला आहे. त्यात ती यशस्वीही झाली आहे. गुलच्या या पोस्टला दोन तासांपूर्वी हजारो लाईक्स मिळाले होते. अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे.

गुलनं त्या पोस्टविषयी लिहिलं आहे की, आज सकाळी उठले तेव्हा काही वेगळा प्रयोग करायचा असा विचार केला होता. पहाटे जाग आली. 5 किमी फार मोठं अंतर नसणारी रनिंग पूर्ण केली. आता मला एकदम छान वाटते आहे. मला माहिती आहे की फिटनेस किती महत्वाची आहे ते. मात्र आपल्यापुढे येत्या काळात फिटनेसचे मोठे आव्हान असणार आहे. हे लक्षात ठेवायला हवे. रनिंग केल्यामुळे मला एकदम प्रसन्न वाटते आहे. फ्रेश झाले आहे. तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट शेयर करताना मला आनंद होतो आहे.

हेही वाचा: बॉलिवूडमधील 'sisters' चा हटके 'फॅशन सेन्स' एकदा पहाच!

गुल पनाग ही शेवटी द फॅमिली मॅनमध्ये दिसली होती. त्यात तिनं एका पोलीस अधिकारी म्हणून भूमिका साकारली होती. याशिवाय तिनं वेगवेगळ्या बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. डोर, जुर्म, मनोरमा, अंबरसरिया सारख्या चित्रपटांमधील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली.

loading image