
Jacqueline Fernandez: सलग चार चित्रपट फ्लॉप तरी, निर्मात्यांची पसंती तिलाच?
Bollywood Actress: बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली गेलेली अभिनेत्री आहे. मात्र गेल्या (bollywood News) काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. तिची महाठक सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) ओळख होती. याकारणावरुन तिला एनसीबीनं (jacqueline fernandiz) चांगलेच फैलावर घेतलं होतं. तिचा पासपोर्टही सील करण्यात आला होता. तिला परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. एवढेच काय तिचे आई वडिल श्रीलंकेत आजारी असताना देखील तिला प्रवासासाठी बंदी होती असे सुत्रांनी सांगितले होते. आता जॅकलीन तिच्या सततच्या अपयशामुळे चर्चेत आली आहे. गेल्या दोन वर्षभरात तिचे चार चित्रपट फ्लॉप झाले आहेत. तरीही निर्मात्यांनी तिच्या नावालाच पसंती दिली आहे.
लागोपाठ चार फ्लॉप चित्रपट देऊनही अनेक निर्मात्यांनी जॅकलीनच्या नावाला पसंती दर्शवली आहे. दुसरं म्हणजे तिची ब्रँड व्हॅल्यु देखील वाढत चालल्यानं नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. तो म्हणजे जॅकलीनच्या नावाला निर्मात्यांची पसंती का मिळते आहे, अभिनेत्रीच्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन पाहता 2018 मध्ये आलेल्या रेस 3 ने प्रेक्षकांची निराशा केली होती. आतापर्यत जॅकलीनची कोणतीही फिल्म शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करु शकलेली नाही. असं असलं तरी बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची सर्वाधिक संधी जॅकलीनला मिळाली आहे. नुकताच तिचा बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाल्याचे दिसून आले आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.
हेही वाचा: Video: महाराजा रणजीत सिंग समर पॅलेस १८ वर्षांनी पर्यटकांसाठी खुला
आता ती जॉन अब्राहमच्या अटॅकमध्येही दिसली आहे. तो चित्रपट अजुन पर्यत फारशी प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. त्याला आव्हान देणारे टॉलीवूडचे तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. रेस3, राधे, भुत पोलीस, बच्चन पांडे आणि अटॅक असे जॅकलीनचे 2018 पासून चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र त्यापैकी कोणतेही चित्रपट चालले नाहीत. असं म्हटलं जातं की, सलमान खान आणि जॅकलीन यांची चांगली ओळख आहे. तिनं सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिनं आतापर्यत सलमानच्या तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर तिचे चार चित्रपट सलमानचा मित्र साजिद नाडियावालाच्या बॅनरनं तयार केले आहे. त्यामुळे काहीही झालं तरी जॅकलीन त्याच्या चित्रपटांमध्ये असतेच.
Web Title: Bollywood Actress Jacqueline Fernandez Brand Value 4 Pictures Flop Back To Back Sueskesh Chandrashekhar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..