esakal | 'काजल इथं लोकांना खायला मिळत नाही आणि तु...'
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actress kajol

'काजल लोकांना खायला मिळत नाही आणि तू...'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री काजोलची लोकप्रियता अद्याप प्रचंड आहे. अजय देवगणच्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटात तिनं शेवटची भूमिका केली होती. त्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. काजोल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी सेलिब्रेटी आहे. चाहत्यांना सतत नवनवीन माहिती शेअर करुन अपडेट ठेवण्यात काजोल नेहमी अग्रेसर असते. सध्या काजोल ट्रोल झाली आहे ते तिच्या एका पोस्टमुळे. देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे या संकटात लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे संकट कोसळले असताना काजोलनं एकप्रकारे त्यांची थट्टा केली आहे. असे ट्रोलर्सनं म्हटलं आहे.

कोरोनामुळे देशातील रुग्णालयांची स्थिती दयनीय आहे. त्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीये. दुसरीकडे व्हॅक्सिनची कमतरता आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शिनचा काळाबाजार सुरु झाला आहे. तसेच अनेक व्यक्तींना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत पडली आहे. अशावेळी काजोलनं शेअर केलेला व्हिडिओ ही त्या व्यक्तींची केलेली थट्टा आहे. अशा शब्दांत काही ट्रोलर्सनं काजोलवर टीका केली आहे. तिच्या अशाप्रकारच्या व्हिडिओमुळे तिच्यावर फॅन्स नाराजही झाले आहेत.

काजोलनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती सफरचंद कापताना दिसत आहे. सफरचंद कापणं ही एक साधारण क्रिया असली तरी काजोलनं ज्याप्रकारे सफरचंद कापले आहे त्यातून तिनं त्या सफरचंद वाया घालवले आहे. अशी भावना फॅन्सची झाली आहे. त्यामुळे त्यांनी काजोलवर टीका केली आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, काजल सफरचंदाला हवेत उडवते आणि त्याच्यावर चाकू चालवते. त्यानंतर त्या सफरचंदाचे दोन तुकडे होतात. आणि ते जमिनीवर पडते. काजलचा हा आगळावेगळा अंदाज चाहत्यांना पसंत पडलेला नाही.

काजलच्या त्या व्हिडिओवर एका युझर्सनं लिहिलं आहे की, अशाप्रकारे खायचे पदार्थ जर वाया घालवले जात असतील तर त्याचा काय उपयोग. सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेकांना दोनवेळचे जेवण मिळत नाही. दुस-या युझर्सनं लिहिलं आहे की, काजल मॅडम अशाप्रकारे अन्नाचा अपमान करु नका.

loading image
go to top