esakal | 'नादाला लागू नका, मी भारीच'...

बोलून बातमी शोधा

 bollywood actress kangana ranaut vidya balan
'नादाला लागू नका, मी भारीच'...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगणाचा एक दिवस व्टिट केल्यावाचून जात नाही असे आतापर्यत दिसून आले आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहे. कंगणाच्या बेताल वक्तव्य करण्याच्या सवयीमुळे बॉलीवूडमध्ये शक्यतो कुणी तिच्या वाट्याला जात नाही. मात्र अनेकदा कंगणाच तिच्याभोवती वाद तयार करत असल्याचे दिसून आले आहे. तिनं आतापर्यत बॉलीवूडच्या कित्येक मोठमोठ्या सेलिब्रेटींवर टीका केली आहे. त्यासाठी ती प्रसिध्दच आहे. सोशल मीडियावर कंगणाचा चांगला बोलबाला आहे. तिचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. आताही कंगणा चर्चेत आली आहे. त्याचे कारण ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल.

काही वर्षांपूर्वी प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालनचा द डर्टी पिक्चर नावाचा चित्रपट आला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कंगणाचे म्हणणे आहे की हा चित्रपट तिला ऑफर झाला होता. मात्र तिनं तो स्वीकारण्यास नकार दिला. त्याचे कारणही तिनं यावेळी सांगितली आहे. कंगणाची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र कंगणाला तो पिक्चर न केल्याचा काही एक पश्चाताप नाहीये. याविषयी तिनं एका मुलाखतीमध्ये काही खुलासे केले होते. त्यात तिनं विद्याच्या अभिनयाबाबत कौतूक केलं होतं.

दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणून द डर्टी पिक्चरचे नाव घेता येईल. त्यासाठी विद्याला अनेक अॅवॉर्डही मिळाले होते. कंगणानं नुकताच टाईम्स ऑफ इंड़ियाला एक इंटरव्ह्यु दिला होता. त्यात तिला डर्टी पिक्चकविषयी विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली, मी तो चित्रपट करायला नाही म्हणाली होते. मला वाटते तो चित्रपट फारच सुंदर झाला होता. विद्याशिवाय आणि कुणी ती भूमिका चांगली केलीच नसती. तिचं काम खूपच प्रभावी झाले होते.

कंगणा म्हणाली, मात्र मला असे वाटते की, त्या चित्रपटाचं महत्वं मला त्यावेळी समजलं नव्हतं. बॉलीवूडमधील मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांविषयी कंगणानं सांगितलं की, मी कधीही राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी आणि धर्मा प्रॉडक्शन्स किंवा यशराज फिल्मच्या लाईनमध्ये गेली नाही. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट मला फारसे पटलेही नाही. मी जरीही त्यांचे चित्रपट केले नसले तरीही मी सध्याच्या घडीला लीड अॅक्ट्रेस आहे. आणि माझं नाव मी स्वत तयार केलं आहे. मी आता इतरांसाठी एक मोठं उदाहरण आहे. त्यामुळे भलेही मला द डर्टी पिक्चर करायला मिळाला नसेल मात्र त्याचा मला तोटा काहीच झालेला नाहीये.