esakal | भारताची व्हॅक्सिन 'बेस्ट' नाही, चेतन बोलला...

बोलून बातमी शोधा

bollywood actress kangana ranaut
भारताची व्हॅक्सिन 'बेस्ट' नाही, चेतन बोलला...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - जगात जे काही लोकप्रिय लेखक आहेत त्यात चेतन भगतचेही नाव घेतले जाते. भारतीय वंशाच्या चेतनला जगभरात मोठ्या प्रमाणावर वाचक आहेत. त्याची लोकप्रियता भारतात तर प्रचंड आहे. जेव्हा चेतनचे एखादे नवे पुस्तक येते त्यावेळी त्याच्यावर वाचकांच्या उड्या पडतात. आतापर्यत त्याच्या काही कादंब-यावर चित्रपटांची निर्मितीही करण्यात आली आहे. चेतन भगत हा सोशल मीडियावर चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिध्द झाला आहे. अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळेही तो चर्चेत असतो. आताही तो वादात सापडला आहे. त्यानं केलेल्या एका प्रतिक्रियेला अभिनेत्री कंगणानं जशास तसे उत्तरही दिलं आहे.

कंगणानं चेतनच्या त्या कमेंटवर चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. चेतननं सांगितले होते की, सध्याच्या कोरोनाच्या काळात ज्या व्हॅक्सिन आल्या आहेत त्यापैकी फायझर्स आणि मॉर्डनाची व्हॅक्सिन बेस्ट आहे. त्यातुलनेत भारताची व्हॅक्सिन बेस्ट नाही. यावर कंगणा त्याच्यावर भडकल्याचे दिसून आले आहे. तिनं चेतनच्या व्टिटला पुन्हा रिव्टिट केले आहे. त्यावर चेतनंची आणि तिच्यात कलगीतुरा रंगला आहे. नेटक-यांनी दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

चेतन म्हणाला होता, फायजर आणि मॉर्डनाचे व्हॅक्सिन्स बेस्ट आहेत. त्या डिसेंबर 2020 मध्ये आल्या होत्या. तोपर्यत त्या भारतात का आल्या नाहीत. आपण बेस्टसाठी का डिझर्व करत नाही. आपण कोरोनासाठी जी काही सामुग्री लागते ती बाहेरच्या देशातून का मागवतो असा प्रश्नही चेतननं यावेळी उपस्थित केला आहे. आता युध्दासारखी परिस्थिती नाहीये का, मला एक कळत नाही व्हॅक्सिन आपल्याकडेच बनायला हवं असा अट्टाहास का केला जात आहे? कंगणानं लिहिलं आहे की, कोण म्हटलं त्या व्हॅक्सिन बेस्ट आहेत ते, माझ्या एका मित्रानं फायझरचे व्हॅक्सिन घेतले होते. त्याला खूप त्रास झाला. आणि तो आजारीही पडला. तुमच्यासारखी लोकं भारताचा व्देष करणं कधी बंद करणार हा प्रश्न आहे.