esakal | कोरोनाची काळजी करणा-यांना कंगणा म्हणाली, 'गप्प बसा, मुर्खांनो'

बोलून बातमी शोधा

bollywood actress kangana ranaut those angry

कंगणा म्हणाली, कोरोना झालायं,'गप्प बसा, मुर्खांनो'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढता कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. अशावेळी कशापध्दतीनं काळजी घ्यावी असा प्रश्नही प्रशासनाला पडला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढते आहे दुसरीकडे औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगणानं कोरोना झालेल्या लोकांवरच आगपाखड केलीय. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

कोरोनाचं व्हॅक्सिन संपल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन बेडची संख्याही कमी आहे अशा अवस्थेत काय करावं असा प्रश्न आरोग्य प्रशासनासमोर आहे. लोकांमध्ये भीती आणि संम्रभाचे वातावरण आहे. अशावेळी कंगणानं केलेले विधान सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यासगळ्या परिस्थितीत कंगणानं ज्या लोकांना कोरोना झाला आहे त्यांच्यावर आपला राग व्यक्त केलायं. याशिवाय सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घटनांवरही ती बोलली आहे. ज्या लोकांना कोरोना झालाय, तसेच ज्यांना रुग्णालयात राहण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत अशांना कंगणानं फटकारलं आहे. कंगणा त्यांना चक्क मुर्ख म्हणाली आहे.

कंगणानं सोशल मीडियावर याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र तिनं बोलताना मर्यादा ओलांडली आहे. तिनं लिहिलं आहे की, सध्याच्या परिस्थितीत जे निराश आहेत ते स्वताच त्याला जबाबदार आहेत. जर सुर्यानं चमकण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काही करु शकत नाही. कारण तो त्याचा निर्णय आहे. हीच ती जमीन आहे जिनं आपल्याला लहानाचे मोठे केले. आणि तिच आता तुम्हा सर्वांची वैरीण झाली का? तुम्ही मुर्खांनो आता शांत बसण्याची गरज आहे.

कंगणानं आपल्या व्टिटमध्ये असे म्हटले आहे की, पृथ्वी तुमच्या आदेशावर चालत नाही. सुर्य तुमच्या सांगण्यानुसार प्रकाश देत नाही. यापूर्वी कंगणानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली होती. ती म्हणाली होती, केजरीवाल तुम्ही केवळ मोदींच्या नावानं शंख करु नका. पहिल्यांदा दिल्ली सांभाळा.