Chandramukhi:चंद्रमुखीचा ट्रेलर बघून माधुरीची भन्नाट प्रतिक्रिया,म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit appreciates actors of Chandramukhi

चंद्रमुखीचा ट्रेलर बघून माधुरीची भन्नाट प्रतिक्रिया,म्हणाली..

बॉलीवूडच्या विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित आजही तीच्या अभिनयाने आणि विलक्षण अदांनी चाहत्यांना भूरळ पाडते.वयाच्या पन्नाशी नंतरही ही सुंदरी बॉलीवूडमधे अॅक्टिव असते.तसेच उत्तम नृत्यांगना असणारी ही अभिनेत्री अनेक डान्स शोजची जज राहिली आहे.या अभिनेत्रीने चंद्रमुखीच्या ट्रेलरवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.नेमकी काय आहे ती प्रतिक्रिया जाणून घेऊया.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.चंद्रमुखी या चित्रपटातील ट्रेलर,गाणी फार चर्चेत आहे.या चित्रपटात दमदार नृत्याने प्रेक्षकांना मोहणारी अमृता खानविलकरची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहेत.येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.अजय देवगणचा रनवे देखिल २९ एप्रिलला रिलीज होणार आहे.अशा वेळी माधुरीने या चित्रपटाला प्रतिक्रिया देणे लाखमोलाचे ठरते.नुकंतच अभिनेत्री माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.(CHANDRAMUKHI)माधुरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले आहे.चित्रपटाचं ट्रेलर अप्रतिम आहे.मी नक्कीच चित्रपट बघणार आहे असे तीने स्टोरीला लिहीले होते.अभिनेता रितेश देशमुख,कॉमेडियन भारती सिंगनेदेखिल या चित्रपटावर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: Chandramukhi: गोपीनाथ मुंडे यांचं बरखा पाटील प्रकरण काय होतं माहितीये?

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे यांनी मनोरंजक संगीत दिले आहे.सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.सोशल मीडियावर या चित्रपटाला भारी प्रतिसाद दिसून येतोय.तरूणी चंद्रमुखिच्या गाण्यावर थिरकत रील्स सोशल मीडियाला पोस्ट करत आहेत.

Web Title: Bollywood Actress Madhuri Dixit Appreciates Actors Of Chandramukhiadhinath Kothareamruta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top