
'बाई गं' म्हणत अमृताने केलं घायाळ..'चंद्रमुखी' चित्रपटाचे नवे गाणे..
Marathi Movies: मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) लिखित चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरला आणि पोस्टर रिलिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. ही 'चंद्रमुखी' कोण याचाही उलगडा काही दिवसांपूर्वी याला. अभिनेत्री अमूर्ता खानविलकर (amruta khanvilkar) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून तिच्या 'चंद्रा' या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांना घायाळ केले आहे.
हेही वाचा: पाहा रणबीर आलियाच्या लग्नाचा अल्बम, कोण आहेत वऱ्हाडी ? कसा होता थाट?
याच चित्रपटातील आणखी एक लावणी आज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेली ‘बाई गं..’ही बैठकीची लावणी असून अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याला चार चांद लागले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने आर्या आंबेकरने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे. ‘लावणीकिंग’ म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याची उंची अधिकच वाढली आहे.
हेही वाचा: कहर झाला !! कलकत्त्यात रणबीर आलियाचे पुतळे करून लावलं लग्न...
‘बाई गं… ही एक बैठकीची लावणी असल्यामुळे ती कशी चित्रित करायची यावर आमच्या टीमसोबत चर्चा सुरू असताना, आमचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या गाण्यासाठी अमृता काळ्या रंगाच्या नऊवारीवर हे सादरीकरण करणार आणि तिच्या खोलीतही अंधार असणार असं सांगितल्यावर सगळेच थोडे बुचकळ्यात पडतो. काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर काळी साडी आणि अंधारी खोली यावर आमचं एकमत झालं. संजय यांच्यावर विश्वास होताच, आणि तो पुन्हा एकदा सार्थ ठरला तो चित्रीकरणाच्या दिवशी… चंद्राचा संपूर्ण महाल समया, पणत्या, लामणदिव्यांनी सजवला होता.’ असे मत या लावणीविषयी दिग्दर्शकी प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.
प्रसाद ओक पुढे म्हणाले, ‘दिव्यांच्या लखलखाटात, अमृता जेव्हा काळी साडी नेसून आली तेव्हा सुमारे पावणे दोनशे लोकांचे युनिट तिच्याकडे एकटक बघत राहिले. तिच्यावर पडणारा तो दिव्यांचा प्रकाश तिचे सौंदर्य अधिकच तेजस्वी करत होते. सर्व युनिट त्यावेळी भारावून गेले होते. अमृताचं ते रूप आम्हा सगळ्यांच्या आजही डोळ्यांसमोर आहे आणि या सगळ्यामुळेच चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल असा विश्वास वाटतो.’
ही लावणी आज दुपारी यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली. आणि अवघ्या काही तासातच लाखो चाहत्यांना या लावणीने वेड लावले आहे. प्रसाद यांनी दिग्दर्शनात षटकार मारला असला तरी अभिनयातही ते आपली जादू दाखवत आहेत. त्यांच्या 'धर्मवीर' चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे.
Web Title: Chandramukhi Movie New Song Bai G Parformed By Amruta
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..