लग्नापुर्वीच महिमा होती गर्भवती; उद्योगपतीसोबत हाेते प्रेमसंबंध

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 13 September 2020

काही कालावधीनंतर माहिमा आणि बॉबीमध्ये सतत भांडणे सुरु झाली. अखेर 2013 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा आज 47 वा वाढदिवस आहे. महिमाचा जन्म 13 सप्टेंबर 1973 मध्ये दार्जिलिंगमध्ये झाला आणि तेथेच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला महिमाने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर महिमा एका दूरचित्रवाणीच्या जाहिरातीत झळकली. महिमाची पेप्सीची जाहिरात खूप लोकप्रिय ठरली होती. या जाहिरातीत महिमा अभिनेता आमिर खान आणि ऐश्वर्या राय यांच्या समवेत दिसली होती. 

सन 1997 मध्ये महिमाचे परदेस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. दिग्दर्शक सुभाष घई यांनी परदेसमध्ये संधी दिली. या चित्रपटात महिमासोबत शाहरुख मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट चाहत्यांनी डोक्‍यावर घेतला होता. महिमाला या चित्रपटासाठी फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यू पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर महिमाने तेरा घर ये मेरा घर, ओम जय जगदीश, दाग: द फायर, प्यार कोई खेल नहीं, कुरुक्षेत्र, लज्जा या चित्रपटांमध्ये काम केले. 

महिमाचे नाव टेनिसपटू लिएंडर पेससोबत जोडण्यात आले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा देखील होत्या. परंतु हे नाते टिकले नाही. लिएंडर पेससोबतच्या ब्रेकअप नंतर अवघ्या काही दिवसांत महिमाने आर्किटेक्‍ट बिझनेसमॅन बॉबी मुखर्जीशी लग्न केले. सन 2006 मध्ये महिमाने हे लग्न गुपचुप केल्याची चर्चाही रंगली.

रियाला तुरुंगात दिले जातेय ‘हे’ जेवण; याशिवाय ‘या’ आहेत सुविधा  

लग्नाच्या बेडीत अडकताच काही दिवसांमध्ये महिमा गर्भवती असल्याच्या चर्चा होत्या. जेव्हा महिमाने आपण गर्भवती असल्याचे जाहीर केले तेव्हा ती लग्नाआधीच गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या. काही दिवसांमध्येच महिमाला मूलगी झाली. तिचे नाव आरियाना असे ठेवण्यात आले. काही कालावधीनंतर माहिमा आणि बॉबीमध्ये सतत भांडणे सुरु झाली. अखेर 2013 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

कष्टाची जाणीव ठेवून मार्गक्रमण करा : ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण गोडबोले 

सन 2015 मध्ये माहिमाने मुंबई द गॅंगस्टर चित्रपटात गॅंगस्टरच्या पत्नीची भूमिका साकारली. त्यानंतर मध्ये तिने डार्क चॉकलेट सन 2016 मध्ये काम केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood Actress Mahima Chaudhary Birthday Satara News