मौनी रॉयशी लग्न करणारा सुरज नामबियार आहे कोण? | Bollywood actress Mauni Roy married Suraj Nambiyar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mauni Roy
मौनी रॉयशी लग्न करणारा सुरज नामबियार आहे कोण?

मौनी रॉयशी लग्न करणारा सुरज नामबियार आहे कोण?

आपल्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय (Mauni Roy). ती तिच्या हटकेपणामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असते. मौनी या महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बॉयफ्रेंड सुरज नामबियार (Suraj Nambiyar) सोबत ती लग्न करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2022 रोजी ती लग्न करणार आहे. कोरोनामुळे तिच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनी ही गोव्यातील (Goa) कँडोलियममध्ये सुरज नामबियार सोबत विवाहबद्ध होणार आहे. 26 जानेवारीला तिचा संगीत सेरेमनी आणि हल्दी सेरेमनी होणार आहे. अनेकांना सुरज नामबियारविषयी फारशी काही माहिती नाही. आपण तो कोण आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. सुरज नामबियरचा जन्म हा कर्नाटकातील बंगळुरुमध्ये झाला. त्यानं त्याचं प्राथमिक शिक्षण हे इंटरनॅशनल रेसिडिंशियल स्कूलमधून केले होते. 2008 मध्ये त्यानं बंगळुरुतील एका कॉलेजमधून इंजिनिअरींग पूर्ण केलं आहे.

हेही वाचा: 83 Movie Review: अविस्मरणीय विजयाची यशोगाथा

सुरजचा एक भाऊ पुण्यात असून त्याचं नाव नीरज आहे. तो एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह संस्थापक आहे. दुसरीकडे सुरज दुबईमध्ये व्यावसायिक आणि बँकर म्हणून कार्यरत आहे. सुरजला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला आवडते. त्याला पर्यटनाची आवड आहे. वाचन हा त्याचा आवडता छंद आहे. सुरज आणि मौनीची ओळख ही दुबईतच झाली होती. काही दिवसांनंतर त्यांनी डेटिंग सुरु केलं.

हेही वाचा: Facebookवर तात्यांची viral पोस्ट, चेतनला मदतीचा ओघ; पाहा व्हिडिओ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top