मौनी रॉय 14 दिवसांनी लग्नबंधनात अडकणार ; दुबईत नाही 'या' ठिकाणी रिसॉर्ट केले बुक l Mouni Roy & Suraj Nambiar Getting Married | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mouni Roy & Suraj Nambiar Getting Married

मौनी रॉय 14 दिवसांनी लग्नबंधनात अडकणार; 'या' ठिकाणी रिसॉर्ट बूक

मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नाच्या स्थळापासून ते पाहुण्यांच्या यादीपर्यंत आणि मेहंदी, हळद ते पार्टीपर्यत सगळे सोशल मिडियावर सध्या सेलेब्रेशन सुरु आहे. कतरिना कैफ-विकी कौशलच्या (Katrina Kaif,Vicky Kaushal) लग्नानंतर आता मौनी रॉय (Mouni Roy)लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मौनी तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) विवाह करणार आहे.

मौनी याआधी दुबईमध्ये लग्न करणार होती पण आता ती २७ जानेवारीला गोव्यात (Goa) लग्न करणार आहे. यासाठी तिने गोव्यातील पंचतारांकित रिसॉर्ट बुक केले असून, पाहुण्यांना आमंत्रणेही पाठवण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर लग्नानंतर २८ जानेवारी डान्स पार्टीचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माता करण जोहर, एकता कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​ उपस्थित राहणार आहेत. मौनी आणि सूरजच्या लग्नात गोराडिया सहभागी होण्याची शक्यता आहे.सध्या मौनी रॉयने लग्नाबाबतअधिकृत घोषणा केलेली नाही.(Mouni Roy & Suraj Nambiar Getting Married)

लग्नापूर्वी हळदी-संगीत समारंभ

लग्नापूर्वी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होणार आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, मौनी आणि सूरज डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. दोघांनी लग्नासाठी दुबईची निवड केली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हे दोघे लग्न आता गोव्यातच करणार आहेत. लग्नानंतर मौनी तिच्या गावी म्हणजे कूचबिहारमध्ये एक भव्य रिसेप्शन ठेवणार आहे. ज्यात तिचे जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. मौनी रॉयचा भावी पती सूरज नांबियार हा बँकर आहे तो दुबईत राहतो.

हेही वाचा: लता मंगेशकरांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांची माहिती

चित्रपटात काम करण्यासाठी मौनीने गाठली मुंबई

बंगाली कुटुंबात जन्मलेल्या मौनीने सेंट्रल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. जामिया मिलिया इस्लामियामधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. यानंतर तिने अभिनयाला सुरुवात केली. चित्रपटात काम करण्यासाठी तिने मुंबई गाठली. 2007 मध्ये तिने टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने आणखी काही शोमध्ये काम केले.

मौनीने अक्षय कुमारसोबतही काम केले आहे

मौनी रॉयने लोकप्रिय टीव्ही शो 'देवों के देव महादेव'मध्ये सतीची भूमिका साकारली होती. मौनीने 2018 मध्ये आलेल्या गोल्ड चित्रपटात अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका केली होती. मौनी रॉय नुकतीच 'बैठे बैठे' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. यामध्ये अभिनेत्री नेहा धुपियाचा पती अंगद बेदीही तिच्यासोबत दिसला होता. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टही आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top