धक्कादायक! दहा अभिनेत्रींची तिहारमध्ये सुकेश चंद्रशेखरशी भेट | Bollywood actress model meet sukesh Chandrashekhar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! दहा अभिनेत्रींची तिहारमध्ये सुकेश चंद्रशेखरशी भेट
धक्कादायक! दहा अभिनेत्रींची तिहारमध्ये सुकेश चंद्रशेखरशी भेट

धक्कादायक! दहा अभिनेत्रींची तिहारमध्ये सुकेश चंद्रशेखरशी भेट

बॉलीवूड पुन्हा एकदा ईडीच्या तपासामुळे चर्चेत आले आहे. प्रख्यात अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) आणि जॅकलीन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez) यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. ते ज्या व्यक्तीच्या संपर्कात होते त्या सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh Chandrasekhar) त्यांना लाखो रुपये किंमतीचे गिफ्ट दिल्याची बातमी यापूर्वी ईडीच्या तपासातून समोर आली होती. त्यानंतर आता एक आणखी धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे. त्यामुळे बॉलीवूडचं वेगवेगळ्या माफियांसोबतचं कनेक्शन किती खोलवर रुजलं आहे याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमध्ये आहे. मात्र तिथे त्याची दहा अभिनेत्रींनी भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. (bollywood actress and model sukesh chandrashekhar in tihar jail)

चंद्रशेखरनं (Sukesh Chandrasekhar) 200 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. असा आरोप त्याच्यावर ईडीनं ठेवला आहे. त्यामुळे तो सध्या तुरुंगात आहे. न्युज 18 नं दिलेल्या एका बातमीनुसार सुकेशची 10 बॉलीवूड अभिनेत्रींनी तो तिहारमध्ये असताना भेट घेतल्याची बाब उघड झाली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे सांगितलं जात आहे. यापूर्वी या प्रकरणामध्ये जॅकलीन फर्नांडिझ आणि नोरा फतेही यांची चौकशी करण्यात आली आहे. यांच्याशिवाय आणखी काही बड्या सेलिब्रेटींची नावं समोर येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा तिहारमध्ये एक मोठं कारस्थान रचत होता. त्यानं त्याठिकाणी एक कार्यालय देखील सुरु केलं होतं. तिथून तो सगळी सुत्रं हलवत होता. त्याला ठिकाणी सर्व सुविधा मिळत होत्या. एवढेच नव्हे तर त्यानं त्याठिकाणी काही मेजवान्याही आयोजित केल्या होत्या. असे सांगण्यात आले आहे. त्याची ज्या दहा अभिनेत्रींनी भेट घेतली त्यांची नावं समोर आलेली नाही. मात्र ईडीच्या पुढील तपासातून ती उजेडात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: अभिनेत्री नोरा फतेही ED ने बजावलं समन्स

हेही वाचा: जॅकलीनला गिफ्टमध्ये मिळाला 52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर

तुरुंगामध्ये वेगवेगळ्या मॉडेलही त्याला (SukeshChandrasekhar) भेटून गेल्याचे सांगितले जात आहे. जेलमध्ये त्याच्यासाठी सगळी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला भेटायला येणाऱ्या व्यक्तींची कुठल्याही प्रकारची नोंद त्या रजिस्टरमध्ये करण्यात आली नाही. जॅकलीन आणि नोराशिवाय आणखी दहा अभिनेत्री अशा होत्या की ज्यांनी सुकेशची जेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात त्या दहा जणी कोण होत्या त्यांची नावं योग्य त्या वेळी ईडी जाहीर करणार असल्याची माहिती सुत्रं देत आहेत.

हेही वाचा: देशाबाहेर जाऊ देऊ नये; EDच्या नोटीशीमुळे जॅकलीनला एअरपोर्टवरच अडवलं

Web Title: Bollywood Actress Model Meet Sukesh Chandrashekhar In Tihar Jail Source Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top