ओळखलं का मला? सांगा पाहू कोणाच्या भूमिकेत आहे मी?

विक्की कौशल 'सॅम बहादुर', फातिमा सना शेख 'इंदिरा गांधी'; लूकनं वेधलं चाहत्यांचे लक्ष
ओळखलं का मला? सांगा पाहू कोणाच्या भूमिकेत आहे मी?

मुंबई - बॉलीवूडमध्ये वेगळ्या भूमिकेसाठी कायमच चाहत्यांचे, जाणकार प्रेक्षकांचे, समीक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून विकी कौशलचे नाव घ्यावे लागेल. तीन दिवसांपूर्वी त्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. देशभरामध्ये त्याच्या विवाहसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता होती. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न केलं. राजस्थानातील एका बड्या महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या दरम्यान विकीचा एक जबरदस्त लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याची झलक पाहून चाहते अवाक झाले आहेत.

बॉलीवूडचं सर्वाधिक लोकप्रिय जोडी विकी आणि कतरिना सध्या चाहत्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला लाखो व्ह्युज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. मात्र दरम्यान विकीच्या नव्या चित्रपटाच्या पोस्टरचाही लूक व्हायरल झाला आहे. तो लूक एवढा जबरदस्त आहे की, त्याच्या झलकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विकीच्या सॅम बहादुरचा लूक समोर आला आहे. त्यामध्ये जनरल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत दंगल गर्ल फातिमा सना शेखनं देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी तर सान्या मल्होत्रानं माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाची निर्मिती आरएसवीपीनं केली असून दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. मेघना गुलजार यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानं मेघना यांनी या दोन्ही अभिनेत्यांचा लूक व्हायरल केला आहे. आणि त्यांच्याविषयी सांगितलं आहे. सॅम माणेकशा हे देशातील सर्वात महान लष्करी अधिकारी होते. त्यांच्या आयुष्य़ावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये विकीनं सॅम यांची भूमिका साकारली आहे. यापूर्वी अक्षय कुमारच्या बेलबॉटममध्ये लारा दत्तानं इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं. या चित्रपटामध्ये ती भूमिका फातिमा सना शेख साकारणार आहे.

ओळखलं का मला? सांगा पाहू कोणाच्या भूमिकेत आहे मी?
अंकिता लोखंडेचा एंगेजमेंट लूक पाहून चाहते म्हणाले,'ही तर बार्बी डॉल!'
ओळखलं का मला? सांगा पाहू कोणाच्या भूमिकेत आहे मी?
Vi-Kat : कतरिना-विक्कीचा लग्नातील Royal look आवडला, मग, तुम्हीही ट्राय करा !
ओळखलं का मला? सांगा पाहू कोणाच्या भूमिकेत आहे मी?
असा रंगला विकी-कतरिनाच्या मेहंदीचा कार्यक्रम; कुटुंबीयांसोबत केला धमाल डान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com