esakal | 'ब्रेस्टफिडिंगचा व्हिडिओ शेअर करशील का?' यावर नेहा ट्रोलर्सला म्हणाली...

बोलून बातमी शोधा

bollywood actress neha dhupia
'ब्रेस्टफिडिंगचा व्हिडिओ शेअर करशील का?' यावर नेहा ट्रोलर्सला म्हणाली...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. अशावेळी ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. त्यातून ती नेहमी तिच्या नव्या प्रोजेक्टविषयीची माहिती देत असते. आता ती चित्रपट क्षेत्रापासून लांब गेली आहे. तिनं परिवाराला महत्व देणं जास्त पसंत केलं आहे. अशावेळी त्याविषयीच्या पोस्ट शेअर करुन तिला अनेकदा वादाचा सामना करावा लागला आहे. अशीच एक पोस्ट त्यामुळे नेहा चर्चेत आली आहे. आपल्या खासगी आयुष्याविषयीही तिच्या पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.

आपल्या पोस्टला कोणी वेगळ्या अर्थानं घेऊन त्यावर कमेंट करत असल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यास ती मागे पुढे पाहत नाही. नेहा काही दिवसांपूर्वी पहिल्यावेळेस ब्रेस्टफिडिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याला एका ट्रोलर्सनं नेहाला अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. त्यावर नेहानं त्याला परखड भाषेत उत्तर दिलं आहे. तु तुझ्या ब्रेस्टफिडींगचा व्हिडिओ शेअर करु शकतेस का, असा प्रश्न त्या ट्रोलर्सनं नेहाला विचारला होता.

नेहानं त्या कमेंटचा स्क्रिन शॉट शेअर केला होता. आणि त्यावर असे लिहिले होते की, मी ब-याचदा अशाप्रकारच्या कमेंटकडे दुर्लक्ष करते. पण काही वेळा राग अनावर होतो. त्यावेळी अशाप्रकारे कमेंट करणा-यांना उत्तर देणं जास्त महत्वाचं आहे. असं मला वाटते. मी ही पोस्ट सगळ्यांसमोर घेऊन आली. मला त्यातून हे सांगायचे होते की, लोकं ब्रेस्टफिडिंग सारख्या विषयाला देखील कशाप्रकारे पाहतात. एखाद्या आईसाठी हे लज्जास्पद असे आहे.

img

neha dhupia news

ज्यावेळी अशाप्रकारे एखादी कमेंट दिली जाते तेव्हा आईला काय वाटते याचा विचार करण्याची गरज आहे. आपण दरवेळी एकाच बाजुनं विचार करतो. दुसरी बाजु लक्षात घ्यायला मागत नाही. त्यामुळे आपल्या मनात समज - गैरसमज तयार होतात. सर्व बाजुनं एखाद्या गोष्टीचा विचार व्हायला हवा. असेही नेहानं यावेळी सांगितले.