प्रियांकाच्या नव्या रेस्तराँमध्ये डोसा दीड हजाराचा! पहा 'देसी' मेनू कार्डची झलक

PRIYANKA
PRIYANKA

नुकताच अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'सोना'या न्यूयॉर्कमधील नव्या भारतीय रेस्तराँचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रेस्तराँच्या अधिकृत अकांउटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनामधील डायनिंग एरिया, बार आणि खाजगी जागेची झलक दाखवण्यात आली आहे. प्रशस्त आणि प्रसन्न अशा या प्रियांकाच्या 'सोना' रेस्तराँच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. हे रेस्तराँ 28 मार्चपासून सूरू झाले आहे. प्रियांकाने देखील रेस्तराँचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने कॅप्शन दिले की, "अप्रतिम भारतीय पदार्थ चाखण्याच्या तळमळीचं रुपांतर प्रेमात झालं आहे. मी तुम्हा सर्वाचं स्वागत करण्याची प्रतिक्षा करु शकतंृ नाही आणि आता तुम्हाला न्यूयॉर्क शहराच्या हृदयात अखंड भारत अनुभवता येईल.सजावटीपासून, पदार्थ चाखून मेन्यू ठरवेपर्यंत आणि रेस्तराँचं नाव सुचवण्यासाठी निक जोनसचे खास आभार.'

प्रियांकाच्या या रेस्तराँच्या मेनूधील पदार्थांच्या किंमती ऐकून तुम्ही देखील चक्रावाल अर्थात या किंमती परदेशी नागरिकांना परवडणाऱ्या असतील पण पिसीच्या भारतीय चाहत्याला जर या रेस्तराँमध्ये जेवायचे असेल तर दोन वेळा विचार करावा लागेल. कारण या रेस्तराँममधील पदार्थाच्या किंमती या  भारतीय  रेस्तराँपेक्षा बऱ्याच महाग आहेत. अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा किंमती प्रियांकाने या पदार्थांना दिल्या आहेत. पाहूयात प्रियांकाच्या यारेस्तराँमधील पदार्थांच्या किंमती किती आहेत. शेफ हरीनायक याने या रेस्तराँचा मेन्यू ठरवला आहे. डिझायनर मेलिसा बॉवर्सने संपूर्ण हॉटेल डिझाइन केले आहे.

पिसीच्या या रेस्तराँमध्ये डोसा खाण्यासाठी 22 अमेरिकन डॉरल म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये दीड हजार मोजावे लागतील. तसेच चिज पालक समोसा,  गोलगप्पा शॉटस्, मालवणी कोळंबी करी, बटर चिकन आणि नान असे अनेक प्रसिद्ध भारतीय पदार्थची अमेरिकेतील लोकांना या रेस्तराँमध्ये चाखता येणार आहेत. यात रोटी, नान, पराठा हे सर्व उपलब्ध असून 8 डॉलरला मिळेल. भारतीय रुपयांमध्ये जवळपास साडे पाचशे रुपये याचे होतात. तर नारळाची खीर आणि गाजराचा हलवा असे प्रियांकाच्या आवडीचे पदार्थ तिने खास ठरवून घेतले आहेत. यासाठी 14 डॉलर भारतीय रुपयांमध्ये जवळपास हजार रुपये द्यावे लागतील. मालवणी कोळंबी करीसाठी आणि बटर चिकनसाठी 28 डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास दोन हजार रुपये मोजावे लागणार. बिर्याणी आणि पुलावचे वेगवेगळे प्रकार आणि तंदूरीदेखील इथे मिळणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SONA (@sonanewyork)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com