रवीनाच्या मुलीपुढे कतरिनाही फेल! फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया|Bollywood Actress Raveena Tondon Daughter Rasha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tondon Daughter Rasha photo Viral

रवीनाच्या मुलीपुढे कतरिनाही फेल! फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून रविनाची वेगळी ओळख आहे. अभिनय, डान्स यामध्ये कुशल असणाऱ्या रविनानं दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये काम केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. यशच्या केजीएफच्या दुसऱ्या भागात तिनं काम केलं (Bollywood News) होतं. त्यापूर्वी तिची एक मालिकाही प्रदर्शित झाली होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ठाम भूमिका आणि सोशल (KGF 2) मीडियावर परखड बोलणारी अभिनेत्री म्हणून देखील रविनाची ओळख आहे. सध्या तिच्या मुलीची राशाची चर्चा आहे. तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रविनाच्या मुलीनं राशानं (Rasha) तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. सोशल (Raveena Tondon) मीडियावर राशा ही नेहमी अॅक्टिव्ह असते. 90 च्या दशकातील मोठी तारका (Bollywood Actress) असणाऱ्या रविनानं 2004 मध्ये उद्योगपती अनिल थडानी यांच्याशी विवाह केला. तिला राशा नावाची मुलगी आणि रणबीर वर्धन नावाचा मुलगा आहे. राशाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रविनानं 1995 मध्ये दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. आता त्या मुलींची लग्नं झाली आहेत.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

रविनाच्या राशाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. राशा दिसायला सुंदर आहे. राशा अभ्यासात जितकी हुशार आहे तेवढीच ती तायक्वांदोमध्ये देखील प्रवीण आहे. तिला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. राशानं ही वेगवेगळी वाद्येही वाजवते. याशिवाय तिला फोटोग्राफीचा देखील छंद आहे. तिला वाईल्ड फोटोग्राफीची आवड आहे. बॉलीवूडचे जे स्टारकिड आहेत त्यामध्ये राशा ही सर्वाधिक सुंदर आहे. असे सांगितले जाते. राशाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

हेही वाचा: 'Bollywood v/s South' वादात अक्षयची उडी; म्हणाला,'देशात फूट पाडणं बंद करा'

Web Title: Bollywood Actress Raveena Tondon Daughter Rasha Thandani Photo Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top