esakal | सारा झाली लग्नाळु, म्हणतेय, 'सुशील, घरेलू, संस्कारी मुलीसाठी स्थळ आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

sara ali khan photo

साराने नुकतेच रॉयल लूकमधील फोटोशूटचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यातला तिचा लूक जबरदस्त तर आहेच पण त्याशिवाय तिने दिलेल्या कॅप्शनची चर्चा सर्वाधिक होत आहे.

सारा झाली लग्नाळु, म्हणतेय, 'सुशील, घरेलू, संस्कारी मुलीसाठी स्थळ आहे का?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - सुशील घरेलू, संस्कारी हे गुण आपल्यामध्ये आहेत असं सांगत लग्नासाठी स्थळ आहे का असा प्रश्न सारा अली खानने विचारला आहे. साराच्या 'प्रपोजल'वाल्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सारा नेहमीच सोशल मीडियावरून फोटो, व्हिडीओ फोटो शेअर करत असते. साराने नुकतेच रॉयल लूकमधील फोटोशूटचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यातला तिचा लूक जबरदस्त तर आहेच पण त्याशिवाय तिने दिलेल्या कॅप्शनची चर्चा सर्वाधिक होत आहे. 

फोटोशूमध्ये साराने रॉयल लूक केला असून तिच्या घागऱ्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. या स्पेशल फोटोशूटमधील साराचा घागरा प्रसिध्द फॅशन डिझायनर मनिष म्हलोत्राने डिझाईन केला आहे. साराला इस्टाग्रामवर 39 लाख फोलोवर्स आहेत. तिने या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोला काही फोलोअर्सनी भन्नाट कमेन्ट्स केल्या आहेत. 

साराने शेअर केलेले फोटोज हे तिच्या कोणत्या चित्रपटातील लूकचे होते की आणखी काही हे स्पष्ट झालेलं नाही. पण फोटोज शेअर करताना तिच्या कॅप्शनवरून चाहत्यांनी मात्र खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत.

हे वाचा - लग्नानंतर २७ वर्षे पतीपासून दूर होत्या अल्का याग्निक; काय होतं कारण?

एका चाहत्याने कमेंट करून लिहीले की, 'मंडप तयार आहे फक्त तु ये', आणखी एका युजरने लिहीले, 'कुबुल है...मी या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहात आहे. प्लिज माझ्यासोबत लग्न कर'. बोल्ड आणि वेस्टर्न लूकपेक्षा साराच्या ट्रेडिशनल लूकला नेटकऱ्यांची जास्त पसंती मिळाली आहे.  

हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या एक्स बॉयफ्रेंडचं लग्न; राज कुंद्राने शेअर केले फोटो

सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे'मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.या आधी सारा ‘कुली नंबर 1’चित्रपटात अभिनेता वरूण धवन सोबत दिसली होती. साराने तिच्या करियरची सुरूवात केदारनाथ या चित्रपटाने केली. त्यानंतर लव आज कल 2, सिंम्बा सारख्या हिट चित्रपटात साराने काम केले. चित्रपटांबरोरच साराने अनेक पुरस्कार सोहळ्यात डान्स आणि अभिनयाचे पर्फोर्मन्स केले आहे.

loading image