esakal | 'दिल्ली क्राईम' फेम शेफालीचं 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी' पोस्टर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

shefai shah directed happy birthday short film

'दिल्ली क्राईम' फेम शेफालीचं 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी' पोस्टर व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

शेफालीच्या नव्या चित्रपटाचे नाव 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी' असे आहे. अभिनयानंतर ती आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. शेफालीनं टेलिव्हिजन, चित्रपट, थिएटर आणि ओटीटी प्लेटफार्मसह अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ती यशस्वी झाली आहे. आपल्या 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'च्या माध्यमातून एक सुंदर लघुपटावर तिनं लक्ष केंद्रित केलं आहे. . या लघुपटाची कथा शेफालीची असून त्याचे दिग्दर्शनदेखील तिनेच केले आहे. आणि आज, सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड सोबत या चित्रपटाचे पाहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे.

शेफालीने आपल्या सोशल मीडियावर याचे प्रभावशाली पोस्टर शेअर करताना लिहिले, माझ्या या नव्या प्रोजेक्टला मला तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. त्याचा फायदा मला प्रोजेक्टसाठी होईल शेफाली 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहानी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे.

हेही वाचा: बॉलिवूडमधील 'sisters' चा हटके 'फॅशन सेन्स' एकदा पहाच!

हेही वाचा: 'सेव्हिंग का करत नाही?, सविता यांच्या आर्थिक तंगीवर 'महागुरु' बोलले

'समडे'नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे. दशकांहून अधिक काळ गाजवणारी एक यशस्वी अभिनेत्री, शेफालीने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या 'अजीब दास्तान्स'मधून आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. लवकरच ती आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत डार्लिंग्स मध्ये दिसणार आहे. 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'चे हे लघुपटाची उत्सुकता वाढवणारी आहे.लघुपटाबाबत बोलताना शेफाली म्हणाली, जे आपले नाते, कुटुंब, घरामुळे ओळखले जात असतात... एक असा पर्याय आपण आनंदाने निवडतो. मात्र, आपण सर्वांनीच हे अनुभवले असेल कि कधी कधी या सर्व जबाबदाऱ्या सोडून देण्याची गरज निर्माण होते. कोविडमुळे झालेल्या लॉकडाउननं आपल्यावर सर्वांपासून वेगळे पडण्याची भावना निर्माण झाली. हॅप्पी बर्थडे मम्मीजीचं कथानक एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करते.

loading image