esakal | 'सेव्हिंग का करत नाही?, सविता यांच्या आर्थिक तंगीवर 'महागुरु' बोलले
sakal

बोलून बातमी शोधा

savita bajaj and sachin pilgoankar

'सेव्हिंग का करत नाही?, सविता यांच्या आर्थिक तंगीवर 'महागुरु' बोलले

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सविता बजाज यांनी आपल्याला जाणवणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली होती. त्या माध्यमातून मदतीचे आवाहनही केले. त्याचे मोठे पडसाद मनोरंजन क्षेत्रात उमटल्याचे दिसून आले आहे. वास्तविक बजाज यांच्यापूर्वी कित्येक सेलिब्रेटींनी पैशांच्या अडचणीमुळे चिंता व्यक्त केली होती.

आता सविता बजाज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या आर्थिक संकटावर मराठीतले प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि महागुरु म्हणून प्रख्यात असणाऱ्या सचिन पिळगांवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कोरोनाचा मोठा फटका छोट्या कलावंतांना झाला आहे. त्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावे लागत आहे. अशातच बॅक आर्टीस्ट कलाकारांसाठी काही मोठे सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला होता.

शगुफ्ता अली, बाबा खान या सेलिब्रेटींनी यापूर्वी आपल्याला जाणवलेल्या आर्थिक चणचणीविषयी सांगितले आहे. सचिन यांनी सांगितले आहे की, सविता बजाज यांच्याबद्दल मी पेपरमध्ये वाचले. मला त्यावर असे म्हणायचे आहे, असोशिएननं त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी आर्टिस्ट आणि टेक्निशियन्सचा सहकार्य करावे. जर त्यांनी सिंटा आणि इंपाक़डे मदत मागावी. मात्र त्यासाठी तुम्ही त्या संघटनांचे सदस्य असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

हेही वाचा: 'बिग बी' म्हणाले म्हणून बदलला 'राष्ट्रपती भवनातील' नियम

सचिन यांनी म्हटले आहे की, तुम्हाला सेव्हिंग ठेवणे गरजेचं आहे. कधी काहीही होऊ शकतं. येणाऱ्या त्या परिस्थितीसाठी तयार राहायला हवं. सध्याचे वातावरण वेगळे आहे. अशावेळी कुठल्याही प्रसंगाला सामोर जाण्यासाठी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात सेव्हिंग हवी. जर तुम्ही अभिनेता आहात तर तुम्हाला हे माहिती हवं की तुमच्यासोबत काहीही होऊ शकतं. यावेळी सचिन यांनी सेव्हिंगचे महत्व पटवून देताना भरत भुषण आणि ए.के.हंगल यांच्या नावाचे उदाहरण दिले आहे. सचिन यांनी यावेळी नवोदितांना देखील सेव्हिंगचा सल्ला दिला आहे.

loading image