अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्राने घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actress shilpa shetty and raj kundra visited saptashrungi devi temple

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्राने घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

वणी (जि. नाशिक) : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी मंगळवारी ( ता.०४) दुपारी साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वंयभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावर आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे (Saptsrhungi) दर्शन घेतले. दरम्यान शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. (bollywood actress shilpa shetty and raj kundra visited saptashrungi devi temple)

आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सप्तशृंगी गडावर दाखल झाले होते. त्यांनी फनिक्युलर ट्रॉलीद्वारे मंदीरात जावून सर्वसामान्य भाविकांप्रमाणे मंदीरात जात आदिमायेचरणी नतमस्तक झाले. यावेळी आदिमायेची आश्वासक मूर्तीसमोर मनोभावे प्रार्थना केली. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी प्रथमच आल्याचे व आम्ही भगवतीचे दर्शनाने अतिशय आनंदीत झाल्याचे सांगितले. मंदीरात पाच मिनीट थांबून दर्शन घेतल्यानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी ट्रस्टच्या प्रसादालयात जावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

हेही वाचा: दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

यावेळी प्रसादात समावेश असलेल्या दाळ, पोळी, जिरा भात, गुळाची लाबशी, वालाच्या शेंगा, उसळ, पापड, लोनचे या पदार्थांचा लाभ घेतला. यांनतर सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थान कार्यालयात संस्थानच्यावतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, नानाजी भामरे यांनी आदिमायेची प्रतिमा व प्रसाद देत सत्कार केला. सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत. मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता पसरल्याने त्यांच्याभोवती चाहत्यांनी भक्तनिवास परिसरात विळखा घातला होता. यावेळी वाढलेली गर्दी पोलिसांनी दूर केली.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे तिला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top