शिल्पा - राज होणार 'विभक्त'?; चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj shilpa
शिल्पा - राज होणार 'विभक्त'? ; चर्चेला उधाण

शिल्पा - राज होणार 'विभक्त'?; चर्चेला उधाण

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली होती. त्याच्यावर अश्लील चित्रपट तयार करणे आणि त्याच्या लिंक परदेशात व्हायरल करणे असा आरोप करण्यात आला होता. सध्या राजला न्यायालयानं जामीन दिला आहे. मात्र यासगळ्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तिला काही रियॅलिटी शो मधून माघारही घ्यावी लागली होती. आता शिल्पा आणि राज विभक्त होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर त्या चर्चेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका टिव्ही शो मधून व्हायरल झालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी लवकरच घटस्फोट घेणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पानं देखील राजचं प्रकरण आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले होते. त्यावेळी आपण एका मोठ्या मानसिक धक्क्याला सामोरं जात असल्याचेही तिनं सांगितलं होतं. यातून अनेकांनी शिल्पा आणि राजमध्ये काही आलबेल नसल्याचा अर्थ लावला होता. सोशल मीडियावर त्या दोघांचा एकत्रित असणारा फोटोही नुकताच व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते पर्यटनासाठी गेले असल्याचे दिसून आले. त्या शो मध्ये सांगितल्यानुसार, शिल्पा आपल्या मुलांसहित राजचं घर सोडणार आहे. राजच्या प्रकरणाचा मुलांवर कोणताही परिणाम होता कामा नये. अशी शिल्पाची धारणा आहे.

मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप अधिकृतपणे शिल्पाकडून याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राजवर बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोपही केला होता. त्याच्याविरोधात पोलीसांकडे धावही घेतली होती. यासगळ्यात अभिनेत्री शर्लिन चोप्राचे नाव आघाडीवर होते. तिनं शिल्पा शेट्टीबद्दलही वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 2009 मध्ये शिल्पा आणि राजचे लग्न झाले होते.

हेही वाचा: Jai Bhim Movie : धमकीनंतर अभिनेता सूर्याच्या सुरक्षेत वाढ

loading image
go to top