esakal | स्वराला पाकिस्तानचा पुळका, शोएब अख्तरचं केलं कौतूक

बोलून बातमी शोधा

bollywood actress swara bhaskar trolled showing solidarity towards shoaib akhtar tweet
स्वराला पाकिस्तानचा पुळका, शोएब अख्तरचं केलं कौतूक
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्याचा सामना करताना शासकीय यंत्रणेसह सर्वांनाच नाकी नऊ आले आहे. अशी परिस्थिती असताना त्यामुळे एका वेगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. बॉलीवूडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होताना दिसतो आहे. लोकांनी आता कोरोनाला त्सुनामी लाटची उपमा दिली आहे. दिवसेंदिवस बदलत जाणा-या कोरोनाच्या परिस्थितीपुढे सर्वजण हतबल होताना दिसत आहे. सध्या ऑक्सिजनची कमी आहे. औषधेही मिळत नाहीयेत. बेड उपलब्ध होत नाहीत. असे भयाण चित्र असताना दुसरीकडे बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे एक नवा वाद तयार झाला आहे.

बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री स्वरा भास्करला अचानक पाकिस्तानचा पुळका आलेला दिसत आहे. तिनं गेल्या एक दोन दिवसांपासून अशा प्रकारचे व्टिट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वरा वादाच्या भोव-यात सापडली आहे. तिच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. स्वरानं अशाप्रकारचे व्टिट का केले असा प्रश्नही तिला यावेळी विचारण्यात आला आहे. स्वरानं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर तिनं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचे झाले असे की, शोएब अख्तरनं भारताच्या समर्थनार्थ त्याच्या व्टिटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यानं कोरोनाच्या परिस्थितीत एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. शोएबचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे त्याला चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. त्यानं लिहिलं आहे की, भारतात कोरोनाचा मोठा संसर्ग होताना दिसत आहे. भारताचा कोरोनातून मार्ग काढण्यासाठी सतत संघर्ष सुरु आहे. मात्र या देशाला आता वैश्विक पातळीवरुही सहर्कायाची गरज आहे. आरोग्य सुविधेचा बोजवारा उडाला आहे. ही वेळ एकमेकांना साथ देण्याची आहे.

अख्तरच्या त्या प्रतिक्रियेवर अभिनेत्री स्वरानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शोएबचं समर्थन केलं आहे. तिनं लिहिलं आहे की, शोएबजी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण आपल्या बोलण्यातून जी मानवता दाखवली आहे त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात. तिचं हे व्ट्टिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे स्वराला ट्रोल करण्यात आले आहे. दुस-य़ा व्टिटमध्ये स्वरानं पाकिस्तानचे कौतूक केलं आहे. त्यामुळे नेटक-यांनी तिच्यावर टीका केली आहे.