esakal | ''तुझ्या फालतू कमेंट्सने...''; तापसीचा राग अनावर

बोलून बातमी शोधा

bollywood actress taapsee pannu got angry troller for bad comment

''तुझ्या फालतू कमेंट्सने...''; तापसीचा राग अनावर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे देशात मोठ्या गंभीर संकटाची परिस्थिती आहे. अशावेळी काय करावं असा प्रश्न दोन्ही सरकारला पडला आहे. राज्यात आणि केंद्रात या महामारीला सामोरं जाताना कशाप्रकारे नियोजन करावं याविषयी चर्चाही सुरु आहे. अनेकांना या आजारानं ग्रासलं आहे. बॉलीवूडमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानं मोठी चिंतेची परिस्थिती आहे. अनेक चित्रपट आणि मालिका यांचे चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले आहे. अशावेळी बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नुनं सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी लोकांना आवाहन केले आहे.

तापसीनं आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर काही महत्वाच्या लोकांचा संपर्क क्रमांक दिला आहे. त्यामुळे ज्यांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे अशांनी त्या लोकांना संपर्क करावा असे सांगितले आहे. मात्र काही युझर्सला तिचा हा अंदाज आवडलेला नाही. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या गोष्टीचा अभिनेत्री तापसीला प्रचंड राग आला आहे. त्यामुळे तिनं त्या संबंधित युझर्सला चांगलेच खडसावले आहे. त्या युझर्सनं तापसीला डोके फिरलेली असं म्हटलं आहे. तापसीला त्यानं सांगितलं की, तुझी कार दे अशा लोकांना. मात्र त्यानंतर तापसीनं त्या ट्रोलर्सला चांगलेच खडसावले आहे.

तापसीनं ज्यावेळी त्या ट्रोलर्सला खडसावले त्यानंतर त्या ट्रोलर्सनं त्याची पोस्ट डिलिट केली आहे. तापसीनं त्या ट्रोलर्सला उत्तर देताना असं सांगितलं आहे की, तु कृपया गप्प राहु शकतो का, तुला जर अशाप्रकारचे बोलायचे असेल तर शांत हो. आता देशाला पूर्वपदावर तर येऊ दे त्यानंतर आपण पुन्हा बोलुया. सध्या माझ्या पोस्टवर अशाप्रकारच्या कमेंट करु नकोस. आणि मला माझे काम करु दे. अशाप्रकारे तापसीनं त्या ट्रोलर्सचं तोंड गप्प केलं आहे.