'ट्विंकल बंद कर तुझं गाणं, ते ऐकल्यावर अक्षयला'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'ट्विंकल बंद कर तुझं गाणं, ते ऐकल्यावर अक्षयला'...
'ट्विंकल बंद कर तुझं गाणं, ते ऐकल्यावर अक्षयला'...

'ट्विंकल बंद कर तुझं गाणं, ते ऐकल्यावर अक्षयला'...

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याची पत्नी व्टिंकल खन्ना ही आता लेखिका झाली आहे. ती समाजसेविका देखील आहे. कोरोनाच्या काळात तिनं मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना आधार देण्याचे काम केले होते. व्टिंकल ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या शेतकरी हिंसाचारावर तिनं तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये तिनं त्या हल्लाची तुलना नव्यानं प्रदर्शित झालेल्या स्वीक्वड गेम्सशी केली होती.

आता व्टिंकल खन्ना चर्चेत आली आहे ते तिच्या एका व्हिडिओमुळे. ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. भलेही व्टिंकल ही चित्रपटांपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. आताही तिच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. त्या व्हिडिओमध्ये तिनं चक्क एक इंग्रजी गाणं गायलं आहे. ते गाणं जेव्हा श्रोत्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी तिला काही गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याचीही चर्चा आहे. व्टिंकल खन्ना आता मोठी लेखिकाही झाली आहे.

व्टिंकलनं तिच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती इंग्रजी गाणं म्हणताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला विचारलं आहे की, हा कोणत्या चित्रपटातील गाणं आहे, आम्हाला या गाण्यातून काहीच कळत नाही. त्यावर व्टिंकल पुन्हा गाऊ लागते. मात्र यावर नेटकऱ्यांनी तिला प्लिज तुझं गाणं आता थांबव. हे गाणं जेव्हा अक्षय ऐकेल तेव्हा त्याला धक्का बसेल. आणि तो घाबरुन जाईल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्टिंकल खन्ना आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माती देखील झाली आहे. तिनं काही चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'तारक मेहता'च्या' टप्पू - बबिताचं बिंग अखेर फुटलं

loading image
go to top