esakal | लग्नाला झाले चार महिने : यामीनं केला आजाराचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Yami Gautam, Aditya Dhar

लग्नाला चार महिने झाले, यामीनं केला आजाराचा खुलासा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या यामी गौतमनं (yammi gautami) तिला झालेल्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चार महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिनं केलेल्या खुलाशानंतर तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. विकी डोनरमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या यामीनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिची भूमिका चाहत्यांना पसंतही पडली आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या यामीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. तिचा सिंपल लूकही यावेळी चर्चेत आला आहे. मात्र तिनं तिच्या नव्या आजारापणाबद्दल सांगितलं आहे. तिला एका त्वचेशी संबंधित आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे ती त्रस्त झाली आहे. त्यावर तिनं उपचार घेण्यास सुरुवातही केली आहे.

यामीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, मी आता स्किनशी संबंधित एका आजाराला सामोरी जात आहे. त्यात मला खूप त्रासही होत आहे. अजून त्यावर कोणताही इलाज नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामीनं नुकतचं एक फोटोशुट केलं आहे. त्यामध्ये तिनं वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी यामीच्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. चाहत्यांनी तिला अनेक कमेंटही दिल्या आहेत. त्या फोटोंना कॅप्शन देताना तिनं सांगितलं आहे की, मी गेल्या लहान असल्यापासून त्वचेच्या आजाराचा सामना करत आहे. आता तो त्रास वाढला आहे.

त्या आजाराचं नाव केरारोसिस पिलारिस (Keratosis- Pilaris) असं आहे. या आजाराविषयी यामीला चाहत्यांना सांगायचं आहे. तिनं लिहिलं आहे की, मी जेव्हा फोटोशुट पूर्ण केलं तेव्हा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये मला माझ्या फोटोंवरुन प्रक्रिया करावी लागली. अर्थात सगळेजण फोटोशुट झाल्यावर त्यावर प्रॉडक्शनमध्ये काम करतात. त्यावेळी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे मला माझा आजारपण लपवता येणार नाही. त्याविषयी लोकांना सांगायला हवं. त्यामुळे जे आहे त्याचा मी स्वीकार करायचा हे ठरवलं आहे.

हेही वाचा: यामी गौतमला ईडीने बजावले समन्स

हेही वाचा: यामी आदित्यचा फॅन्सवर 'सर्जिकल स्ट्राईक', गुपचूप उरकलं लग्न

loading image
go to top