यामी आदित्यचा फॅन्सवर 'सर्जिकल स्ट्राईक', गुपचूप उरकलं लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yami gautam and aditya dhar

यामी आदित्यचा फॅन्सवर 'सर्जिकल स्ट्राईक', गुपचूप उरकलं लग्न

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम (yami gautam) आता चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं गुपचूप लग्न उरकलं आहे. नवरीच्या वेशभूषेमध्ये यामी कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामीचं लग्न तिच्या चाहत्यांसाठी सरप्राईज म्हणावं लागेल. सध्या तिच्या या टॉप सिक्रेट (top secret) लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. ( yami gautam ties the knot in private ceremony shocked fans call it perfect surgical strike)

यामीनं उरी (uri the surgical strike) या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्याशी लग्न केले आहे. आदित्यनं उरी - द सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्यानं यामीशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणा-या आदित्यचाही चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे त्याचे नाव सर्वश्रृत झाले. एका संवेदनशील विषयाची मांडणी त्यानं प्रभावीपणे त्या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती.

आदित्य आणि यामीचा जोडा सुंदर दिसतो आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्या फोटोंना दोघांच्याही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. आदित्यनं पारंपारिक वेशभुषा केली आहे. त्यानं डोक्याला पगडीही बांधली आहे. शुक्रवारी या दोघांनी आपआपल्या फॅन्सला मोठे सरप्राईज दिले आहे.

हेही वाचा: बनावट आयडी वापरुन व्हॅक्सिन घेतलं, अभिनेत्री सौम्यावर आरोप

हेही वाचा: नेटकऱ्यांनी मागितला बिकिनी फोटो; अभिनेत्रीने शेअर केला 'हा' Pic

यामीनं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न झाल्याची माहिती दिली आहे. आदित्यनंही त्याच्या अकाऊंटवरुन विवाहबध्द झाल्याचे सांगितले आहे. त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीया मिर्झांनं त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.