Adil-Rakhi Sawant: राखीचा ड्रामा काही संपेना! आता आदिलनचं सोडलं मौन म्हणाला,.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adil-Rakhi Sawant

Adil-Rakhi Sawant: राखीचा ड्रामा काही संपेना! आता आदिलनचं सोडलं मौन म्हणाला,..

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. तर दुसरीकडे तिने तिचा प्रियकर आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला आहे. तेव्हापासून राखी आणि आदिल सतत चर्चेत आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: लग्नाचा पत्ता नाही अन् राखी गरोदर? म्हणाली,..

व्हिडीओ आणि फोटो शेअर करून राखीने आदिलसोबत लग्न केल्याचा पुरावाही सादर केला. मात्र आदिलने याबद्दल काही बोलणं टाळलं. त्यामुळे तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं जात होतं. आता त्यातच आदिलने शेवटी त्याचं मौन सोडलं.

राखी सावंतने अचानक आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या लग्नाचा खुलासा केला होता, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर राखी उघडपणे तिच्या लग्नाबद्दल बोलत होती, तेव्हा आदिलने त्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर आदिलने बोलण्यासाठी थोडा वेळ मागितला होता.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

हेही वाचा: Shiv Thakare: बिग बॉसची ट्रॉफी शिवचीचं! अमृता फडणवीसांनी दिली शिव ठाकरेला शाबासकी

त्याचवेळी, आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिलने राखी सावंतसोबतचे लग्न मान्य केले आहे. तो म्हणतो की तो आपल्या कुटुंबाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे.

लग्नाबाबत बोलतांना आदिल म्हणाला, 'माझं आणि राखीचं लग्न झालं आहे आणि आम्ही दोघेही एकत्र आनंदी आहोत. याची माहिती कुटुंबीयांना आहे, मात्र त्यांनी अद्याप ते मान्य केले नसून आम्ही त्यांची समजूत काढत आहोत. आधी मी हे नाकारत होतो, पण नंतर पाहिले की जिथं राखी आहे तिथे वादही होतात. अशा स्थितीत मला वाटले की, मीडियामध्ये इतक्या गोष्टी घडत असताना लग्नाची गोष्ट मान्य करायला हरकत नाही. त्याचवेळी आदिलच्या मुलाखतीवेळी राखीही त्याच्यासोबत होती.

हेही वाचा: Bigg Boss 16: भारती-हर्षचा बिगबॉसच्या घरात दंगा! सलमानला बनवलं मुलाचा बेबी सीटर..

गेल्या काही दिवसांआधीच राखीने लग्नाचा खुलासा करताना 7 महिन्यांपूर्वी आदिलसोबत लग्न केल्याचं सांगितले होतं. मात्र आदिलने तिला या लग्नाबाबत गप्प राहण्यास सांगितलं होतं असं ती म्हणाली. राखीने या लग्नाचे काही फोटोही शेअरही केले. ज्यात राखीने मुस्लिम रितीरिवाजांनुसार आदिलशी लग्न केल्याचं दिसतं.

त्याचबरोबर राखीने लग्नासाठी तिचा धर्मही बदलल्याचे सांगितले जात आहे. राखीने फातिमा नाव ठेवलं आहे. लग्नाव्यतिरिक्त त्याने कोर्ट मॅरेजही केले आहे.