
Shiv Thakare: बिग बॉसची ट्रॉफी शिवचीचं! अमृता फडणवीसांनी दिली शिव ठाकरेला शाबासकी
टिव्हिवरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. याचा मराठी सिझन नुकताच संपला मात्र आता प्रेक्षकांना हिदीं बिग बॉसच्या विजेत्याची प्रतिक्षा आहे. यंदाचा सोळावा सिझन जो गाजवतोय तो म्हणजे मराठमोळा शिव ठाकरे...
त्याच्या गेमनं सर्वांचच मन जिंकले आहे. तो घरातील प्रेक्षकांनाही आवडतो त्याचबरोबर घरा बाहेरही त्याचीच हवा आहे. त्याने मराठीचा दुसरा सिझन जिंकला आणि त्याने आता बिग बॉस हिंदीचा 16 सिझनही जिंकावा असं त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
हेही वाचा: Amruta Fadnavis : गाणं ऐकल्यावर देवेंद्रजींचा मूड कसा होता? अमृता फडणवीसांचं उत्तर, 'त्यांना तर…'
त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना शिव ठाकरे बद्दल विचारलं असता त्यांनीही शिव ठाकरेचं तोंड भरुन कौतूक केलं.
हेही वाचा: Bigg Boss 16: बिग बॉस करणार धमाका! एक दोन नव्हे तर 'हे' तीन स्पर्धक जाणार घराबाहेर..
‘आज मैं मूड बना लिया’ या नवीन गाण्यामुळे अमृता फडणवीस चर्चेत आहेत. त्या गाण्याचं प्रमोशनही त्या करत आहेत. याप्रसंगी नुकतंच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांना मुलाखतीत प्रश्न विचारला गेला त्यावेळी त्या म्हणाल्या, 'मराठी बिग बॉसमध्ये मी पाहुणे कलाकार म्हणून गेले होते. परंतु, हिंदी बिग बॉसमध्ये येण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही'.
Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
यावेळी तिला बिग बॉस हिंदीमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला बघून कसं वाटतयं असा प्रश्न तिला विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, 'शिव ठाकरे खूप चांगला खेळ खेळत आहे. महाराष्ट्राचा मुलगा शिव ठाकरेचा मला अभिमान आहे.' अशा शब्दात त्यांनी शिव ठाकरेचं कौतुक केलयं.