Akshay Kumar: 'टॉयलेट' आणि 'पॅडमॅन'नंतर आता अक्षय कुमारचा सेक्स एज्यूकेशनवर नवा चित्रपट...

Akshay Kumar
Akshay KumarEsakal
Updated on

( Akshay Kumar next filmis based on the topic of sex education) बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा त्याच्या अॅक्शन आणि कॉमेडी भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. मात्र त्याने अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट बनवले आहेत. त्यांचा 'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा चित्रपट आणला होता. ग्रामीण भागातील अनेक लोक घरात शौचालये बनवत नाहीत आणि त्यामुळे सर्वांनाच विशेषत: महिलांना खूप त्रास सहन कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो, त्याचबरोबर त्याच्या परिणामांवर प्रकाश टाकला. या चित्रपटाशिवाय अक्षयने सॅनिटरी पॅडवरही एक चित्रपटही बनवला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता तो पुन्हा अशाच एका मुद्द्यावर चित्रपट घेऊन येत आहे.

Akshay Kumar
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

आता अक्षय एका ज्वलंत मूद्दयावर चित्रपट घेवून येणार आहे. तो विषय असणार आहे सेक्स एज्यूकेशन.... या विषयावर लोक अजूनही बोलायचे टाळतात. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट नुकताच जेद्दाह येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाला होता, जिथे त्याने त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती दिली. पुढील चित्रपट लैंगिक शिक्षणाचा विषयावर भाष्य करणारा असल्याचे त्याने सांगितले.सध्या तो या चित्रपटावर काम करत आहे.

Akshay Kumar
Bigg Boss 16: अख्या घराला बोटावर नाचवणारा शिव आज ढसाढसा रडला! अर्चनाचेही अश्रू अनावर.. कारण ऐकून..

हॉलिवूड ट्रेड मॅगझिन डेडलाइनशी बोलताना याविषयी तो म्हणाला, 'हा खूप महत्त्वाचा विषय आहे. अनेक ठिकाणी असं होत नाही. आपल्याकडे शाळेत सर्व प्रकारचे विषय आहेत. लैंगिक शिक्षण हा एक विषय आहे जो जगातील सर्व शाळांमध्ये शिकवला जावा असं मला वाटते. हा चित्रपट बनण्याकरीता वेळ लागेल. हा चित्रपट एप्रिल-मे 2023 मध्ये येऊ शकतो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. 'मला अशा प्रकारचे सामाजिक चित्रपट करायला आवडतात. असे चित्रपट फार बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत नसले तरी पण असे चित्रपट केल्याने मला समाधान मिळते.'

हे ही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर खिलाडी कुमार नुकताच आयुष्मान खुरानाच्या 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' चित्रपटात कॅमिओमध्ये दिसला होता. त्याचबरोबर तो 'सेल्फी', 'OMG 2' या चित्रपटात दिसणार आह. तो सूरराई पोत्रू नावाचा दक्षिण चित्रपटाचा हिंदी रिमेकही करत आहे. यासोबतच तो जसवंत सिंग गिल यांच्यावर बायोपिकही करत आहे, ज्याचे नाव अद्याप ठरलेलं नाही. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com