Alia Bhatt Baby Girl: आई बनली आलिया अन् भांडे वाजवत नाचतेय राखी...झाली ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt Baby Girl
Rakhi Sawant

Alia Bhatt Baby Girl: आई बनली आलिया अन् भांडे वाजवत नाचतेय राखी...झाली ट्रोल

आज सोशल मिडियाच नव्हे तर सर्वंत्रच आलिया आणि रणवीरच्या मुलीची चर्चा आहे. आलिया आणि रणबीर एका गोंडस लेकीचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे कपूर आणि भट्ट फॅमिलीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. हे दोन्ही कुटुंबीय सध्या मुलीच्या स्वागताने प्रचंड आनंदी झाले आहेत. सर्वंच सेलिब्रिटिंनी या दाम्पत्यांना कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र ड्रामा क्वीन राखी सांवतने नेहमीप्रमाणे ड्रामा करत यादोघांना शूभेच्छा दिल्या आहेत. तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

राखी सावंतचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या इस्टांपेजवरुन व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आनंद व्यक्त करत आहे. चमच्याने तवा वाजवत आहे. ‘लक्ष्मी आली, घरात लक्ष्मी आली’ म्हणत ति आनंद व्यक्त करत आहे. यानंतर राखी सावंतने आलियाचे नाव घेत कॅमेऱ्यासमोर मिठाई दाखवली आणि ही मिठाई तुझ्यासाठी घे असे म्हणते. देशातील जनतेसाठी मिठाई घ्या. आज एक अभिमानाचा क्षण आहे. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला. आलिया आई बनली असून तिने परीसारख्या गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

राखी सावंतचा बॉसफ्रेंड आदिल दुर्रानी यानेही रणबीर आणि आलियाला या आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Alia Bhatt Baby Girl: मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी

याआधीही राखी आलियाच्या बाळाबद्दल राखी सावंत खूपच उत्साहित दिसत आहे. तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राखी म्हणतेय की 'आलिया मम्मा आणि रणवीर पापा होणार आहेत आणि मी राखी सावंत मावशी होणार आहे'. व्वा काय चांगली बातमी. आलिया मला खूप आनंद झाला आहे. व्वा नीतू जी तू आजी होणार आहेस.'

हेही वाचा: Alia Baby Girl: आलियाच नव्हे तर 'या' अभिनेत्रींही होत्या लग्नापुर्वीच प्रेग्नंट

यावर तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलयं. यात एकानं म्हटलंय ‘दवाखान्यातच जाउन ये’ तर दुसऱ्याने लिहिलयं ‘जा जाउन बधाई घे तो तवा नको वाजवू’ असं म्हणत तिला जोरदार ट्रोल केलयं...