Anushka Sharma: अनुष्काचं सरप्राइज गेलं फेलं केकसकट आपटली जमीनीवर.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma: अनुष्काचं सरप्राइज गेलं फेलं केकसकट आपटली जमीनीवर....

Anushka Sharma: अनुष्काचं सरप्राइज गेलं फेलं केकसकट आपटली जमीनीवर....

 भारताचा धडाकेबाज क्रिकेटर आणि माजी कर्णधार विराट कोहलीने काल त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. काल त्याच्यावर वाढदिवसांच्या शूभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र त्याच्या बायकोने दिलेल्या शूभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली.अनुष्काने त्याला खास शुभेच्छा देतांना काही फोटो सोशल मीडियावर फनी फोटो पोस्ट केले होते या फोटोंमध्ये विराट कोहलीच्या चेहऱ्याचे भाव पाहण्यासारखे आहेत.

हेही वाचा: Virat Kohli birthday: पहिली भेट ते आजवरचा प्रवास;अनुष्का शर्माने दिल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या विचित्र शुभेच्छा...

जितक्या हटके शूभेच्छा तिने दिल्या तितकचं भारी तिनं विराटला बर्थडे सरप्राइज द्यायचं प्लॅनिंगही केलं होतं. पण तिचा प्लॅन फॉप झाल्याचं दिसतंय. अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत एका नवीन जाहिरातीत दिसली

ही जाहिरात विराटच्या वाढदिवसाशी संबधित आहे. या जाहिरातीत त्याच्या लॅपटॉपवर काम करत थकलेला विराट घेऊन बेडवर झोपलेला दिसतो. विराटच्या वाढदिवसाचा केक घेण्यासाठी अनुष्का किचनकडे जाते अन् फ्रिज उघडते. निळ्या रंगात, त्यावर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' लिहिलेला केक हातात घेऊन अनुष्का केक कापण्यासाठी चाकू काढण्यासाठी ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ड्रॉवर काही उघडत नाही. ते अडकलेल ड्रॉवर उघडण्याच्या प्रयत्नात ती हँडल जोरात खेचते तेव्ह तिच्या हातात ड्रॉवरचे हँडलच येते अन् ती धाडकन् केकसोबत जमिनीवर पडली.

हेही वाचा: Virat Kohli : रन मशीन कोहली पैसे छापण्यातही आहे 'किंग', संपत्तीचे आकडे पाहून डोळे फरतील!

त्याचा आवाज ऐकून घाबरलेला विराट चोरांच्या अपेक्षेने हातात झाडू घेऊन बेडरूममधून किचनमध्ये जातो. मात्र, त्याला अनुष्का फरशीवर पडलेली दिसते आणि केक तिच्या आजूबाजूला विखुरलेला दिसतो. अनुष्काने त्याला 'हॅपी बर्थडे' केक टॉपर दाखवल्याने विराट चेहऱ्यांचे भाव बदलतो. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.