बॉलिवूडचा हा कलाकार म्हणतो मला मायकेल जॅक्‍सन सारखे व्हायचय 

बॉलिवूडचा हा कलाकार म्हणतो मला मायकेल जॅक्‍सन सारखे व्हायचय 


मुंबई : मायकेल जॅक्‍सन आणि ब्रुनो मार्स सारखे परिपुर्ण कलाकार होण्याची माझी इच्छा असल्याचे बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफने म्हणले आहे. टायगर श्रॉफ हा बॉलिवूड मध्ये ऍक्‍शन हीरो म्हणून ओळखला जातो. तरी देखील त्याने आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून काही म्युझीक अल्बम देखिल केले आहेत. 


टायगर म्हणतो की म्युझीक अल्बम मधून मला वेळ मिळतो. ते छोटे असले तरी एखाद्या शॉर्ट फिल्म सारखे असतात. त्यांना देखिल सुरुवात, मध्य आणि शेवट असतो. त्यामुळे मी म्युझीक अल्बमचा देखील भरपूर आनंद घेतो. तसेच कमी वेळामध्ये आपल्याला आपला दृष्टीकोन मांडण्याची संधी त्यातून मिळते आणि त्यातून मला आनंद मिळतो असे टायगर यावेळी म्हणाला. 


यावेळी टायगरला तुला यापढे गाणे गाण्याचा काही नियोजन आहे का असे विचारले असता तो म्हणाला की हो मी गाणे गाऊ शकतो, तसेच मी मायकेल जॅक्‍सन आणि ब्रुनो मार्स यांचा चाहता असून ते दोघे एक परिपुर्ण असे कलाकार आहेत. ते गाणे नाचत देखील होते आणि गाणे देखिल गाऊ शकत होते. त्यामुळे माझी देखिल तसे काम करण्याची इच्छा आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com