भाईजानचा 'राधे' 235 कोटींना विकला; 14 मे ला होणार प्रदर्शित

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

सलमानच्या मुव्हीचे डिस्ट्रीब्युशन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि म्युझिक राइट्स तब्बल 235 कोटींमध्ये विकले गेले आहेत.

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान असणा-या सलमान खानच्या राधे, मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटावरुन काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरु झाली होती. त्याचे कारण म्हणजे त्या चित्रपटाचे हक्क विकण्याविषयीची ही चर्चा होती. विशेष म्हणजे त्यावेळी सलमानला राधेसाठी 250 कोटींची ऑफर देण्यात आली होती. त्यानं ती नाकारली होती. आता तोच चित्रपट 235 कोटींना विकला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाचे वेध लागले आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असे सलमानच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी त्याला 250 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र त्यानं सलमानला नकार दिला होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या मुव्हीचे डिस्ट्रीब्युशन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि म्युझिक राइट्स तब्बल 235 कोटींमध्ये विकले गेले आहेत. अशा प्रकारच्या डीलला अंब्रेला डील म्हटले जाते. हा चित्रपट पहिले चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल आणि त्यानंतर झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा प्रीमिअर होईल. हे सर्व हक्क ‘झी स्टुडिओज’ने विकत घेतले आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 14 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वितरकांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी असणारे कोरोनाचे सावट यामुळे त्याचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला

लॉकडाऊनमुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्माता आणि दिग्दर्शक यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.   
गेल्या अनेक दिवसांपासून या व्यवहाराविषयी मेकर्स आणि झी यांच्यात चर्चा सुरु होती. या डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओज’ला विकला आहे. ज्यामध्ये थिएटरचे अधिकार, ग्लोबल रिलीज, म्युझिक, ओटीटी आणि सॅटेलाईट हक्क पूर्णपणे ‘झी’ कंपनीला देण्यात आले आहेत. ‘झी’ कंपनीनेदेखील त्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील असल्याचे म्हटले आहे.

'आम्हाला वादाची सवयचं आहे'; आयकरचा पडला छापा

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत याविषयी अधिक माहिती देताना सलमान म्हणाला होता की, थिएटरचे मालक आणि एक्सहिबिटर्स सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राधे हा चित्रपट मी थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. सलमानचा हा चित्रपट 230 कोटींहून अधिक व्यवसाय नक्की करेल, असा विश्वास ‘झी’ कंपनीने व्यक्त केला आहे.

सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. चित्रपटात सलमानसह जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा हे देखील लीड रोलमध्ये दिसतील. 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' कोरियन फिल्म 'द आउटलॉज'चा हिंदी रिमेक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood bhaijan actor salman khans radhe rights sold for rs 235 crore