
रेमो डिसुझानं भाईजानने केलेल्या मदतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या रुग्णालयातील अनुभवाविषयी सांगितले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा प्रख्यात कोरिओग्राफर रेमो डिसुझा हा गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे तो एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही केली होती. दिवसेंदिवस त्याची खालावत जाणारी तब्येत या कारणास्तव चिंताही वाढली होती. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या मदतीला धावून गेला आहे.
रेमो डिसुझानं भाईजानने केलेल्या मदतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या रुग्णालयातील अनुभवाविषयी सांगितले आहे. ज्यावेळी मोठ्या आजाराशी लढत होतो तेव्हा माझ्या मदतीला सलमान खान धावून आला याचा मला विशेष अभिमान वाटतो. भाईजान नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जातो. त्यासाठी त्याला ओळखले जाते. आणि म्हणून तो सर्वांना प्रिय आहे. संकटाच्या काळी त्याने दिलेला मदतीचा हात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. मी आणि माझे परिवारातील सर्वच जण त्याचे आभारी आहेत.
बिग बॉस ड्रामा: राखी सावंतने फाडले राहुलचे कपडे, 'हेच जर महिलेच्या बाबतीत...' अली गोनीचा सवाल
सलमानचे कौतुक करताना तो म्हणाला, ज्यावेळी सलमान माझी मदत करायला आला तेव्हा तो मला एक फरीशता वाटला. जे माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे. त्याच्याजवळ सोन्यासारखे हृदय आहे. तो मदतीशील आहे त्यासाठी त्याला केव्हाही हाक मारा त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. खरं तर माझे आणि त्यांचे एवढे काही बोलणे होत नाही. मात्र माझी पत्नी लिजेल हे एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे आहे. त्यांचे एकमेकांशी बोलणे होत असते. जेव्हा मी रुग्णालयात दाखल झालो तेव्हा तिने त्यांना फोन केला.
हे ही वाचा: नाट्यरसिकांसाठी नव्या वर्षात पर्वणी, 'या' कलाकृती पुन्हा रसिकांसाठी होणार सादर
पत्नीने सलमानला फोन केला. आणि त्यांना पूर्ण परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर सलमान यांनी माझी विचारपूस केली. एवढंच नाही तर डॉक्टरांशी ते बोलले. हे पाहून मी फार भारावून गेलो होतो. त्यादिवशी झाले असें की मी आणि लिजेल नेहमीप्रमाणे जिमला गेलो होतो. मी ट्रेडमिल वर धावायला सुरुवात केली. आणि बॉडी स्ट्रेच करायला लागलो. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी माझा ट्रेनर म्हणाला की आता व्यायाम बंद करायला हवा. दरम्यान माझी तब्येत फार खालावत चालली होती. मी घाबरलो त्यानंतर तडक डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यास सुरुवात केली. असेही रेमोने सांगितले.